VIDEO : बिग बॉस फेम सूरज चव्हाणचा 'गुलिगत धोका!' गुपचूप उरकला साखरपुडा? म्हणाला 'अखेर आनंदाचा दिवस…'

Last Updated:

Suraj Chavan Engagement Video : बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणचा साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सूरज चव्हाणचा साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूरज चव्हाणचा साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसमुळे तो घराघरात पोहोचला आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस जिंकल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 'झापुक झुपूक' सिनेमाची घोषणा केली होती, ज्यात सूरज मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला, पण त्याला प्रेक्षकांची म्हणावी तशी पसंती मिळाली नाही आणि तो फ्लॉप ठरला. अशातच आता सूरज चव्हाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्याच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे!

आलिशान एन्ट्री, लाजेने लालबुंद आणि...

सूरजने आपल्या इन्स्टाग्रामवर एक खास रील शेअर केली आहे. या रीलमध्ये तो एकदम डॅशिंग लुकमध्ये, आलिशान गाडीतून सुटाबुटात एका मुलीच्या घरी जाताना दिसतोय. तिथे त्याचे जंगी स्वागत केले जाते. व्हिडिओमध्ये सूरजची बहीणही दिसते. त्यानंतर एक सुंदर मुलगी पाण्याच्या ग्लासेस घेऊन येते. तिला बघताच क्षणी सूरज अक्षरशः लाजेने लालबुंद होतो! त्याची बहीण त्या मुलीला ओवाळते आणि नंतर सूरज त्या मुलीला सोन्याची अंगठी घालतो. ती मुलगीसुद्धा सूरजला अंगठी घालते. हा सगळा प्रकार पाहिल्यावर, सूरजचा साखरपुडा झाल्याचाच भास होतो.
advertisement
advertisement

'गुलिगत धोका!' खरे काय ते ऐका...

पण, थांबा! इथेच तर आहे 'गुलिगत धोका'! सूरजचा खरंच साखरपुडा झालेला नाही, तर तो झोपेत स्वप्न बघत होता! व्हिडिओच्या पुढच्या भागात सूरजची बहीण त्याला झोपेतून उठवते आणि म्हणते, "उठ लवकर आता! किती वेळ झोपतोयस, त्या घराचे काम बघ. काय त्या उशीचा मुका घेत बसलायस." त्यावर सूरज म्हणतो, "झोपू दे की, कसले भारी स्वप्न पडलेले!" हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत सूरजने, "अखेर आनंदाचा दिवस उजाडला..." असे कॅप्शन लिहिले आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे!
advertisement

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स!

सूरजच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूपच भन्नाट आणि मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले, "Congratulations करणारच होतो तेवढ्यात धोका झाला". तर दुसऱ्याने लिहिले, "गुलिगत धोका". आणखी एक म्हणाला, "सूरज भाऊ, व्हिडिओ पाहून खरंच खूप भारी वाटले, डोळ्यात पाणी आले, खूप खुश झालो!" तिसऱ्याने लिहिले, "सूरज, अभिनंदन टाइप केलेले रे पण शेवटी गुलिगत धोका दिलास".
advertisement
सूरज चव्हाणच्या या व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर हशा पिकला आहे. 'झापुक झुपूक' भलेही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असेल, पण सूरजने आपल्या या व्हिडिओतून चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, हे नक्की!
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : बिग बॉस फेम सूरज चव्हाणचा 'गुलिगत धोका!' गुपचूप उरकला साखरपुडा? म्हणाला 'अखेर आनंदाचा दिवस…'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement