BBM6: सातव्या आठवड्यात बिग बॉसचा मोठा डाव! राखी सावंतला दिलं सिक्रेट टास्क, तन्वी कोल्तेसोबत घालणार राडा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: आजच्या भागात 'बिग बॉस'ने राखीला एक असं सिक्रेट मिशन दिलं आहे, ज्यामुळे घरातील वातावरण चांगलंच तापणार आहे.
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून सचिन कुमावतचा निरोप घेतल्यानंतर आता खेळाने एका नव्या टप्प्यामध्ये प्रवेश केला आहे. सातवा आठवडा सुरू होताच घरामध्ये नवा राडा आणि नवं राजकारण सुरू झालं आहे. कारण जिथे राखी सावंत आहे, तिथे शांतता अजिबात नसते. आजच्या भागात 'बिग बॉस'ने राखीला एक असं सिक्रेट मिशन दिलं आहे, ज्यामुळे घरातील वातावरण चांगलंच तापणार आहे.
काय आहे बिग बॉसचा नवा डाव?
आज 'बिग बॉस'ने राखीला गुपचूप कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतलं आणि तिच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली. टास्क असा आहे की, तन्वीच्या ताब्यात असलेला आणि ज्यावर 'तंतोतंत' असा मेसेज लिहिलेला आहे, तो टी-शर्ट राखीला तिच्या नकळत पळवायचा आहे. हा टास्क ऐकल्यावर राखीच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी होती, पण हे काम वाटतं तितकं सोपं नाहीये.
advertisement
वॉशरूम ते बेडरुम... राखीची 'तंतोतंत' शोधाशोध
प्रोमोमध्ये दिसतंय की, राखीने आपलं मिशन पूर्ण करण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. तिने आधी तन्वीला गोड बोलून पटवण्याचा प्रयत्न केला, "अगं, तुझा तो टी-शर्ट दाखव ना गं एकदा.." पण तन्वीही काही कमी नाही! तिने लगेच राखीला सवाल केला, "का? तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय?" तन्वीकडून डाळ शिजत नाहीये हे पाहून राखीने चोरट्या पावलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. वॉशरूम एरियापासून ते सामानाच्या बॅग्सपर्यंत राखीने सगळं घर पालथं घातलंय, पण तो 'तंतोतंत' टी-शर्ट काही तिच्या हाती लागत नाहीये.
advertisement
advertisement
'पॉवर की'वरून प्रभू आणि प्राजक्तामध्ये जुंपली
एकीकडे राखीचं सिक्रेट मिशन सुरू असताना दुसरीकडे घरात 'पॉवर की' वरून महायुद्ध पेटलंय. प्राजक्ताची महत्त्वाची चावी आता प्रभू याच्या ताब्यात आहे. प्राजक्ताने आपली चावी परत मागितली, पण प्रभूने ती देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. यावरून या दोघांमध्ये झालेला शाब्दिक वाद आता घरातील शांतता भंग करणार आहे. प्रभूच्या या आडमुठेपणामुळे प्राजक्ता आता कोणतं पाऊल उचलणार, हे पाहणं रंजक ठरेल.
advertisement
सोशल मीडियावर या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांचं असं म्हणणं आहे की, "राखी कितीही डोकं लावलं तरी तन्वी तिला तो टी-शर्ट देणार नाही." तर काही जण राखीच्या खेळाचं समर्थन करत आहेत, "राखी आली म्हणून शोमध्ये आता खरी मजा येतेय!"
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 7:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6: सातव्या आठवड्यात बिग बॉसचा मोठा डाव! राखी सावंतला दिलं सिक्रेट टास्क, तन्वी कोल्तेसोबत घालणार राडा










