advertisement

खुर्चीला बांधलं, तोंडाला टेप; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांची गळा चिरून हत्या; राहत्या बंगल्यात रक्ताचा सडा

Last Updated:

सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांची त्यांच्याच आलिशान बंगल्यात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने हा खून झाला आहे, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

News18
News18
Tamil actress Vishnupriya father Murder: थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोडाईकनालमध्ये एका धक्कादायक हत्याकांडानं संपूर्ण तमिळ चित्रपटसृष्टी हादरली आहे. तमिळ अभिनेत्री विष्णुप्रिया हिचे ७३ वर्षीय वडील सूर्यनारायणन यांची त्यांच्याच आलिशान बंगल्यात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.
ज्या पद्धतीने हा खून झाला आहे, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले असून यामागे एखाद्या मोठ्या सूडाचा कट असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भयंकर पद्धतीने झाला खून

कुरिंजी अंदावर मंदिराजवळ असलेल्या सूर्यनारायणन यांच्या बंगल्यात हा थरार घडला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा सूर्यनारायणन यांचा मृतदेह एका खुर्चीवर आढळून आला. त्यांचे दोन्ही हात रश्शीने घट्ट बांधलेले होते आणि ओरडता येऊ नये म्हणून त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावण्यात आली होती.
advertisement
बंगल्यातील दोन कर्मचारी, अरुमुगम आणि मुरली हे देखील दोरीने बांधलेल्या अवस्थेत सापडले. धक्कादायक म्हणजे, मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीची हार्ड डिस्क आणि घरातील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला आहे.
हा बंगला पर्यटकांना भाड्याने दिला जायचा. गेल्या दोन दिवसांपासून तिथे पाच तरुण वास्तव्यास होते. या तरुणांनीच हा कट रचला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस सध्या फरार झालेल्या या संशयितांचा शोध घेत असून कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.
advertisement

आरोपींनी जुन्या गुन्ह्याची दिली शिक्षा?

या प्रकरणाला खरा वळण मिळतं ते २०१८ मधील एका जुन्या गुन्ह्यामुळे. पोलीस या हत्येचा संबंध प्रभाकरन नावाच्या कार ड्रायव्हरच्या खुनाशी जोडत आहेत. २००५ मध्ये सूर्याच्या 'मायवी' चित्रपटात काम करणारी अभिनेत्री विष्णुप्रिया ही विवाहित होती, मात्र तिचे प्रभाकरनशी जवळचे संबंध निर्माण झाले होते.
वडील सूर्यनारायणन यांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांनी मुलीला अनेकदा बजावलं, पण ती ऐकली नाही. अखेर रागाच्या भरात सूर्यनारायणन यांनी भाडोत्री खुनी लावून प्रभाकरनचा गळा चिरून खून घडवून आणला होता. त्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती आणि सध्या ते जामिनावर बाहेर होते.
advertisement
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मते, सूर्यनारायणन यांची ज्या पद्धतीने हत्या झाली आहे, ते पाहता हा प्रभाकरनच्या खुनाचा बदला असू शकतो. प्रभाकरनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच मारेकऱ्यांनी सूर्यनारायणन यांना तशाच प्रकारे संपवलं का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विष्णुप्रिया सध्या चेन्नईत राहते, आपल्या वडिलांच्या या अशा अंतमुळे तिला मोठा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
खुर्चीला बांधलं, तोंडाला टेप; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांची गळा चिरून हत्या; राहत्या बंगल्यात रक्ताचा सडा
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement