'तुम्ही जनावरं…' लाइव्ह कॉन्सर्टमध्ये राडा, भडकला गायक थेट शो सोडून निघून गेला, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ग्वालियरमध्ये 25 डिसेंबर रोजी कैलाश खेर यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांनी गोंधळ घातल्याने शो थांबवावा लागला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वर्ष संपत आलं आहे आणि सगळेच एन्जॉय करण्याच्या मोडमध्ये आहेत. अनेक ठिकाणी गायकांच्या मोठ्या लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आल्या आहेत. लाइव्ह कॉन्सर्टला तरुणवर्ग मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. मागच्या काही महिन्यात गायकांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये उडालेला गोंधळ अनेकांनी पाहिला आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये लोकांनी गोंधळ घातला. या गोंधळाला गायक वैतागला आणि स्टेज सोडून निघून गेला. त्याने गोंधळ घालणाऱ्या पल्बिकला चांगलंच सुनावलं. गायकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बॉलिवूड गायक कैलाश खेर यांचा ग्वालियरमध्ये 25 डिसेंबर रोजी लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. खेर आपल्या दमदार आवाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात पण इथे सगळा गोंधळ उडाला. भर कार्यक्रमात लोकांनी गोंधळ घातल्याने कार्यक्रम बंद करावा लागला.
advertisement
कैलाश खेर ग्वालियरमध्ये लाइव्ह शोसाठी आले होते. त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली. प्रेक्षकांमधील काही जणांनी सिक्युरिटी बॅरिकेट्स तोडत थेट स्टेजकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे आयोजकांसह सिक्युरिटी यंत्रणाही गोंधळून गेली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
ही परिस्थिती पाहून कैलाश खेर स्वतः स्टेजवरून प्रेक्षकांना चांगलंच झापलं. ते प्रचंड संतापले होते. "अशा पद्धतीने वागू नका. जनावरांसारखं वागणं शोभत नाही", असं म्हणत त्यांनी लोकांना सुनावलं. त्यांनी प्रेक्षकांना इशाराही दिला की, जर कोणी सिंगिंग इन्स्ट्रुमेंट्सकडे किंवा स्टेजकडे धाव घेतली तर शो तात्काळ बंद केला जाईल. परिस्थिती नियंत्रणात येत नाही हे लक्षात आल्यानंतर अखेर शो थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
Gwalior Concert के दौरान दर्शकों की हुड़दंगई से नाराज हुए Kailash Kher, कहा जनवरगिरी मत करो!
.
.#kailashkher #kailashkherconcert #gwaliornews #gwaliorcity #kailashkhersongs pic.twitter.com/OLlSVb5cir
— Aayudh (@AayudhMedia) December 26, 2025
advertisement
कलाकारांसोबत अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूर यांच्या लाइव्ह शोदरम्यान एक प्रेक्षक थेट स्टेजवर चढला होता. सिक्युरिटी गार्ड्सनी त्याला खाली उतरवलं. साऊथ अभिनेत्री सामंथा हिला देखील एका इव्हेंटदरम्यान गर्दीतून असभ्य वर्तनाचा सामना करावा लागला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 12:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुम्ही जनावरं…' लाइव्ह कॉन्सर्टमध्ये राडा, भडकला गायक थेट शो सोडून निघून गेला, VIDEO










