ना अफेअर, ना डेटिंग! मोहम्मद सिराज आणि जनाई भोसलेच्या नात्याचं सत्य आलं समोर, VIDEO Viral
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Mohammad Siraj-Janai Bhosale :गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. दोघांचे एकत्र असलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल तर्क-वितर्क लावले. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
रक्षाबंधनानिमित्त जनाई भोसलेने एक व्हिडीओ शेअर करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जनाई भोसलेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये ती मोहम्मद सिराजला राखी बांधताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचे प्रेम आणि भावा-बहिणीचे पवित्र नाते स्पष्टपणे दिसून येते. जनाईने सिराजच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर सिराजनेही तिला एक भेटवस्तू दिली.
advertisement
या व्हिडीओला कॅप्शन देताना जनाईने लिहिले आहे, "हॅप्पी राखी. एक हजारों में... यापेक्षा चांगले काही मागू शकत नाही." जनाई आणि सिराजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
जनाई ही आशा भोसले यांच्या मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. ती अनेक वेळा आजीबरोबर स्टेजवर दिसते, तसेच पार्ट्यांमध्ये अभिनेत्री आणि बहीण श्रद्धा कपूरसोबतही स्पॉट होते.
advertisement
advertisement
सिराजबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंड दौऱ्यावर त्याने पाच कसोटी सामन्यांत तब्बल 23 बळी घेतले. ओव्हल कसोटीत त्याचा कहरच पहायला मिळाला. दुसऱ्या डावात पाच आणि एकूण 9 विकेट्स घेत टीम इंडियाला 6 धावांनी थरारक विजय मिळवून दिला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 10, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ना अफेअर, ना डेटिंग! मोहम्मद सिराज आणि जनाई भोसलेच्या नात्याचं सत्य आलं समोर, VIDEO Viral


