अखेरच्या श्वासापर्यंत बासरी वाजवली, हॉस्पिटलमधील डॉक्टरही झाले भावुक, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
प्रसिद्ध बासरीवादक दीपक शर्मा यांचे चेन्नई येथे निधन, शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये बासरी वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, संगीत क्षेत्रात शोककळा.
कलेवर निस्सीम प्रेम करणारा सूर काळाच्या पडद्याआड झाला याचं दु:ख आहेच पण त्याही पलिकडे आज बासरीचा तो मंत्रमुग्ध करणारा सूर पुन्हा ऐकायला मिळणार नाही या आठवणीनेच डोळ्यात पाणी येतं. या कलाकाराने शेवटच्या श्वासापर्यंत बासरी वाजवली. कलेवर असलेलं प्रेम आणि त्यातून मिळणारं समाधान आता आपल्यात नसेल य़ा विचारांनीच चाहते हळवे झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेले प्रसिद्ध बासरीवादक दीपक शर्मा यांचं ३ नोव्हेंबर रोजी चेन्नई इथे निधन झालं.
दीपक शर्मा यांच्या निधनामुळे संगीत विश्वात शोककळा पसरली. मात्र, त्यांचे निधन होण्याच्या अगदी काही वेळ आधीचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. हॉस्पिटलमधील बेडवरुन ते बासरी वाजवताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांनी वाजवलेली धून ऐकून डोक्टरांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. दीपक शर्मा यांना गंभीर आजारामुळे चेन्नईतील रिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
आपण फार काळ जगणार नाही याची जाणीव असताना जाता जाता त्यांनी सगळ्यांना आपल्या बासरीचे सूर पुन्हा एकदा लाईव्ह ऐकवले. हातात बासरी घेऊन अत्यंत शांतपणे वाजवत होते. आयुष्याच्या अंतिम क्षणांमध्ये त्यांनी जी धून ऐकवली त्यानंतर सगळेच हळवे झाले डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अखेरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
advertisement
जुबिन गर्ग आणि सय्यद सादुल्लाह यांच्या निधनानंतर संगीत जगताने एका आणखी दिग्गजाला गमावले आहे. दीपक शर्मा यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झालं. त्यांच्या 'जादुई' बासरी वादनाची ती शेवटची धून ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाणी आलं. कलेवर निस्सीम प्रेम करणारा हा बासरीचा सूर कायमचा हरपल्याचं भावना आजही सोशल मीडियावर चाहते व्यक्त करत आहेत.
advertisement
दीपक शर्मा यांना मागच्या काही वर्षांपासून लीवरचा गंभीर आजार होता. त्याच्याशी झुंज देत होते. उपचार सुरू असतानाही त्यांनी बासरी वाजवणं कुठेही कमी केलं नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये देखील त्यांनी बासरी वाजवली. त्यांचा हा व्हिडीओ खूप भावूक करणारा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/देश/
अखेरच्या श्वासापर्यंत बासरी वाजवली, हॉस्पिटलमधील डॉक्टरही झाले भावुक, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी


