'तुझ्यासाठी मुंबई चांगली नाही...' मराठी अभिनेत्रीला निनावी पत्र; केला धक्कादायक खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Deepti Devi Shocking Incident : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी काही पत्र येत होती. ती पत्रे एक ज्योतिषी पाठवत होता. या पत्रांमध्ये नेमकं काय असायचं? याचा खुलासा तिने केला आहे.
मुंबई : 'मला सासू हवी', 'अंतरपाट' सारख्या मराठी मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीप्ती देवी हिने तिच्या आयुष्यातील अनेक विचित्र घटना चाहत्यांसमोर आणल्या आहेत. अभिनेत्रीच्या घरी काही पत्र येत होती. ती पत्रे एक ज्योतिषी पाठवत होता. या पत्रांमध्ये नेमकं काय असायचं? याचा खुलासा दीप्तीने केला आहे.
रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत दीप्तीने याबाबत खुलासा केला. दीप्ती म्हणाली, “माझ्या घरी काही निनावी पत्रे येतात. त्यावर एका ज्योतिषाचं नाव आहे. त्यावर त्यांचा पत्ता नाही, काही नाही. दर आठवड्याला त्यांचं मला एक मोठं पत्र येतं. ज्याच्यात असं सांगितलं जातं की, दीप्तीचं हे चाललं आहे. तिने हे हे करू नये. दीप्तीसाठी मुंबई चांगली नाही. दीप्तीसाठी हे हे चांगलं नाही. लोक तिचा फायदा उचलतील, तिने पुण्यातच शिफ्ट झालं पाहिजे.” असे पत्र मला सतत येतात. पण या पत्रांना कधीच जुमानलं नाही. पण माझे आई-बाबा फार सेन्सिटिव्ह आहेत.
advertisement
( Aai Kuthe Kay Karte: शेवटचा सीन अन् ढसाढसा रडली अरुंधती! एका एपिसोडसाठी मधुराणी मोजायची इतके पैसे )
“ज्योतिषी कोण आहेत हे माहिती नाही. कदाचित ते कोणी मोठे असतील. पण कळत नाही कारण ते जे पत्र पाठवतात ते टाइप केलेली असतात. त्यामुळे हस्ताक्षर कळत नाहीत. स्टिकरने फक्त माझा पत्ता लिहितात, त्यांचा लिहिलेला नसतो. त्यामुळे मध्यंतरी खूप उहापोह झाला होता की काय झालंय हे”, असं दीप्तीने सांगितलं.
advertisement
दीप्ती पुढे म्हणाली, “सुरुवातीला मी घाबरले नाही पण हळूहळू पत्रे वाढत गेली आणि त्यात डिटेल्समध्ये लिहिलं जाऊ लागलं. आई-बाबांवर त्याचा जास्त परिणाम व्हायला लागला. सतत तिच तीच गोष्ट कोणीतरी सांगत राहिलं तर त्या गोष्टीवर आपला हळूहळू विश्वास बसायला लागतो. तसं माझं झालं. मी मुंबई सोडू शकत नाही कारण ती माझी कर्मभूमी आहे. मी जेव्हा सीरियल करत नाही तेव्हा मी पुण्यात असते. पण त्या पत्रांचा आई-बाबांवर खूप परिणाम झाला, मी घरच्यांचं खूप काऊन्सिलिंग केलं. जे व्हायचं आहे त्याला मी जबाबदार आहे.”
advertisement
advertisement
“पत्रे येणं आता येणं बंद झालं. मी देवाचे आभार मानले. मी कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण आपल्या आजूबाजूला इतकी व्यवधानं आहेत की मी त्यांचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न केला नाही”, असं दीप्तीने सांगितलं.
दीप्ती म्हणाली, “मला आधी वाटायचं की माझ्या गोष्टी ज्यांच्याबरोबर शेअर करतेय त्यांच्यातील कोणीतरी हे करतंय का? त्यावेळेस मी असा शोध घेतला होता. मी नातेवाईकांना विचारलं होतं की माझी पत्रिका तुम्ही कोणत्या ज्योतिषांकडे नेली होती का? त्या पत्रावर नाव होतं पण नंबर नव्हता. मी गुगल केलं पण काहीच सापडलं नाही. मी हाही विचार केला की फॉलो करूया आपल्यासाठी चांगलं असेल पण आता मला तेवढाही वेळ नाहीये. कारण सल्ला देणं सोपं असतं पण ते आंगिकारणं, त्याला वेळ लागतो. तुम्हाला कितीही ज्योतिष कळलं तरी तुमचं आयुष्य तुमच्या एकट्याचं असतं. तुमच्यासमोर येते ते तुम्ही फेस करता.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 21, 2024 12:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुझ्यासाठी मुंबई चांगली नाही...' मराठी अभिनेत्रीला निनावी पत्र; केला धक्कादायक खुलासा







