Devmanus 3: 'देवमाणूस' चा खेळ संपणार! खतरनाक खलनायकाचं कमबॅक, थेट लुंगीवर घेतली एंट्री

Last Updated:

Devmanus 3: देवमाणूस’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. पहिल्या सीझनमध्ये खोट्या डॉक्टर अजित कुमार देवच्या कारस्थानांनी लोकांना थरार दिला.

 'देवमाणूस'चा खेळ होणार खल्लास
'देवमाणूस'चा खेळ होणार खल्लास
मुंबई : ‘देवमाणूस’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. पहिल्या सीझनमध्ये खोट्या डॉक्टर अजित कुमार देवच्या कारस्थानांनी लोकांना थरार दिला. दुसऱ्या सीझनमध्येही डॉक्टरची पकड आणि सुटका या खेळामध्ये प्रेक्षकांना सतत ट्विस्ट अनुभवायला मिळाले. पण तिसरा सीझन सुरू झाल्यानंतर मात्र प्रेक्षकांना तोच दम जाणवला नाही. कथा कंटाळवाणी होत चालली आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. आता मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होणार आहे.
आता मात्र मालिकेत एक मोठा ट्विस्ट आणण्यात आला आहे. चाहत्यांचा लाडका पात्र इन्स्पेक्टर मार्तंड जामकर पुन्हा एकदा मालिकेत दाखल झाला आहे. ही भूमिका मराठीतील दिग्गज अभिनेते मिलिंद शिंदे साकारत आहेत. जामकरच्या एंट्रीने प्रेक्षकांना पुन्हा थ्रिलचा अनुभव मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
जामकरने दुसऱ्या सीझनमध्ये डॉक्टरच्या विरोधात पुरावे शोधून त्याला अटक केली होती. पण डॉक्टरच्या कारस्थानांमुळे तो सुटला. त्यामुळे जामकरची लढाई अपुरीच राहिली होती. आता तिसऱ्या भागात त्याने पुन्हा एंट्री घेतल्यामुळे “डॉक्टरचा खेळ खरंच संपणार का?” असा प्रश्न पडतो आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये सरळ संदेश देण्यात आला आहे, “देवमाणसाचा खेळ खल्लास करायला येतोय इन्स्पेक्टर जामकर!” हा डायलॉग प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवतो.
advertisement
मिलिंद शिंदे हे मराठीतील अनुभवी कलाकार. त्यांनी आजवर नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये ठसठशीत कामगिरी केली आहे. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स दमदार आहे. त्यामुळे ‘देवमाणूस 3’ मध्ये त्यांची एंट्री ही खरं तर TRP साठी मास्टरस्ट्रोक ठरू शकते.
advertisement
एकीकडे अजित कुमार देवच्या कपटपूर्ण कारवाया सुरूच आहेत, तर दुसरीकडे जामकर त्याला थांबवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे पुढील काही भागांमध्ये प्रेक्षकांना प्रचंड थ्रिल आणि धक्कादायक ट्विस्ट्स पाहायला मिळतील
मराठी बातम्या/मनोरंजन/
Devmanus 3: 'देवमाणूस' चा खेळ संपणार! खतरनाक खलनायकाचं कमबॅक, थेट लुंगीवर घेतली एंट्री
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement