समंथा, तमन्ना, रकुल प्रीतच्या नावाखाली सुरू होतं भयंकर कृत्य, प्रकार पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
निवडणुका जवळ आल्या की, मतदार यादीत होणारा गोंधळ काही नवीन नाही, पण यावेळी थेट बॉलिवूड आणि साऊथच्या टॉप अभिनेत्रींची नावे मतदार यादीत दिसल्याने मोठी खळबळ माजली आहे.
मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, मतदार यादीत होणारा गोंधळ काही नवीन नाही, पण यावेळी थेट बॉलिवूड आणि साऊथच्या टॉप अभिनेत्रींची नावे मतदार यादीत दिसल्याने मोठी खळबळ माजली आहे. तेलंगणा राज्यातील जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटिया, समांथा रुथ प्रभू आणि रकुल प्रीत सिंह यांचे बनावट मतदार ओळखपत्र सापडले आहेत.
एकाच पत्त्यावर तिघींचे मतदान कार्ड!
या बनावट ओळखपत्रांवर केवळ या अभिनेत्रींचे फोटोच नव्हते, तर त्या तिघींचा पत्ताही एकच दाखवण्यात आला होता. जुबली हिल्ससारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात हा प्रकार उघडकीस आल्याने, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
advertisement
या वर्षी जून महिन्यात बीआरएसचे आमदार मागंटी गोपीनाथ यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. इतक्या मोठ्या आणि हायप्रोफाईल निवडणुकीत हा बनावटीचा खेळ सुरू असल्याचे पाहून स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षही चकित झाले आहेत.
advertisement
Telangana|Hyderabad
EC takes serious note of fake posts claiming Tollywood heroines Rakul Preet, Samantha & Tamannaah are Jubilee Hills voters
EC filed a police complaint over the misleading propaganda; Hyderabad officials have launched an inquiry into the alleged voter slips pic.twitter.com/F5VZyNIDQT
— Gummalla Lakshmana (@GUMMALLALAKSHM3) October 16, 2025
advertisement
एकीकडे घोटाळ्यात नाव, दुसरीकडे शूटिंगची लगबग
या बनावट मतदार कार्ड घोटाळ्यात नाव येत असतानाच सध्या अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हैदराबाद शहरात आहे. ती लवकरच तिच्या आगामी तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समांथा लवकरच दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांच्यासोबत एका प्रोजेक्टसाठी काम करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा 'फॅमिली मॅन' फेम राज आणि डीके यांनी लिहिली आहे. 'मा इन्टी बंगारम' असे या चित्रपटाचे नाव असून, या महिन्याच्या अखेरीस त्याचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
यापूर्वी समांथा वरूण धवनसोबत 'सिटाडेल हनी बनी' या सीरिजमध्ये दिसली होती, मात्र तिच्या दुसऱ्या सीजनचे काम रद्द झाले आहे. या तिन्ही अभिनेत्रींच्या नावाचा गैरवापर करत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट ओळखपत्रे तयार करण्याचे कारण काय? आणि यामागे कोण आहे, याचा कसून तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
समंथा, तमन्ना, रकुल प्रीतच्या नावाखाली सुरू होतं भयंकर कृत्य, प्रकार पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली