advertisement

चोरी ते सैफ अली खानावर हल्ला, आरोपीला बेड्या-कोर्टात हजर, दोन्ही बाजूने तगडे युक्तिवाद, काय काय घडलं?

Last Updated:

Saif Ali Khan Case Update : अटकेनंतर हल्लेखोराला न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात नेमका काय युक्तीवाद झाला हे जाणून घेऊया.

अटकेनंतर हल्लेखोराला न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात नेमका काय युक्तीवाद झाला हे जाणून घेऊया.
अटकेनंतर हल्लेखोराला न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात नेमका काय युक्तीवाद झाला हे जाणून घेऊया.
मुंबई : सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश लागलं आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलिस या प्रकरणाची कसून तपास करत आहेत. या प्रकरणी त्यांनी आता पर्यंत ५० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी ठाण्याहून एकाला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी आज सकाळी ९ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. आरोपीला पकडण्यासाठी सुमारे १०० अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) आहे. त्याच्याकडे कोणतीही भारतीय कागदपत्रे नसल्याने हा आरोपी बांग्लादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. अद्याप याविषयी काही स्पष्टता नसून चौकशी सुरू आहे.
advertisement
पोलिसांनी हा आरोपी बांग्लादेशी असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय वळण असल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं की सैफ अली खानच्या घरावर झालेल्या हल्ला हा चोरीच्या उद्देशाने करण्यात आला आहे. आरोपीने चौकशीच्या दरम्यान सांगितलं, सैफ अली खानच्या घरात तो चोरीच्या उद्देशाने घुसला होता, त्याला माहित नव्हते की तो ज्या घरात चोरी करणार आहे ते बॉलीवूड अभिनेत्याचे घर आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपी इमारतीत घुसला होता. आरोपीला जिथे सुरक्षित मार्ग दिसला, तिथे तो गेला आणि तो सैफ अली खानच्या घरी पोहोचला.
advertisement
अटकेनंतर हल्लेखोराला न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पुढील चौकशीसाठी आरोपीला १४ दिवसांची कोठडी सुनावण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. यावेळी न्यायालयात नेमका काय युक्तीवाद झाला हे जाणून घेऊया.
advertisement

पोलिस काय म्हणाले? 

पोलिसांनी सांगितले, आरोपी कोणत्या मार्गाने आला, त्याला गुन्ह्यात कोणी मदत केलीय का, तिकडून कोणी अजून व्यक्ती आलेत का, अशा अनेक प्रश्नांचा तपास करायचा आहे. म्हणून 14 दिवसाची कोठडी हवी.

आरोपीचे वकील काय म्हणाले?

त्यावर आरोपीच्या वकीलांनी सवाल केला की पोलीस कोणत्या आधारावर आरोपी बांगलादेशी असल्याचे बोलत आहेत. पोलीस कस्टडीची गरज नाही. तो तरुण व्यक्ती आहे.
advertisement

सैफ अली खानच्या वकीलांनी काय प्रश्न केला?

यावर सैफ अली खानच्या वकीलांनी प्रश्न केला की आरोपी हा चोरीच्याच हेतूने आला होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तो परिसर त्याला माहित होता. ज्याप्रकारे तो चाकू घेऊन आला, म्हणजे तो पूर्ण तयारीने आला होता. त्याचा खरा हेतू काय होता? त्याला कोणी मदत केली हे समजणं गरजेचं आहे.
advertisement
या युक्तीवाद ऐकून न्यायाधीश म्हणाले, हा बांगलादेशी आहे असं पोलीस म्हणत आहेत. म्हणून या केसमध्ये इंटरनॅशनल कॉन्सपरन्सी होऊ शकते. त्यामुळे आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
चोरी ते सैफ अली खानावर हल्ला, आरोपीला बेड्या-कोर्टात हजर, दोन्ही बाजूने तगडे युक्तिवाद, काय काय घडलं?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement