advertisement

Rajpal Yadav Emotional: "सर, माझ्याकडे पैसे नाही...", तिहार जेलच्या अधिकाऱ्यांसमोरच राजपाल यादव भावुक

Last Updated:

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव तिहार तुरूंगामध्ये सरेंडर झाला आहे. सरेंडर होण्यापूर्वी राजपालने तुरूंग अधिकाऱ्यांजवळ आपली हकिकत मांडली आहे. अभिनेता आपली हकिकत मांडताना भावूक झाला.

Rajpal Yadav Emotional: "सर, माझ्याकडे पैसे नाही...", तिहार जेलच्या अधिकाऱ्यांसमोरच राजपाल यादव भावुक
Rajpal Yadav Emotional: "सर, माझ्याकडे पैसे नाही...", तिहार जेलच्या अधिकाऱ्यांसमोरच राजपाल यादव भावुक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेकदा अभिनेत्याला चेक बाऊन्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता देखील अभिनेता तिहार जेलमध्ये तुरूंगामध्ये आहे. अभिनेत्याला अटक करण्यात आली नसून त्याला सरेंडर होण्याचे आदेश देण्यात आले होते, त्याप्रमाणे अभिनेता सरेंडर झाला आहे. सरेंडर होण्याच्या आधी अभिनेत्याने महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. अभिनेत्याने तिहार जेलच्या अधिकाऱ्यांजवळ आपली हकिकत मांडली आहे. त्याच्या भावनिक कमेंटवर फॅन्ससह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही इमोशनल झाले आहेत. राजपाल यादव तिहार जेलच्या पोलीस अधिकाऱ्यांना काय म्हणाला ? जाणून घेऊया...
तिहार जेलच्या अधिकार्‍यांसमोर समर्पण (आत्मसर्पण) होण्यापूर्वी राजपालने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज एक्सने दिलेल्या वृत्तानुसार, राजपाल त्याच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर भावनिक होऊन म्हणाला की, "सर, माझ्याकडे पैसे नाही आणि दुसरा काही उपाय सुद्धा माझ्याजवळ नाही, तुम्हीच सांगा मग काय करू? सर मी इथे एकटाच आहे, इथे जवळपास माझा कोणता मित्र सुद्धा नाही. या अडचणीवर मला एकट्यालाच मात करावी लागणार आहे." अभिनेत्याला बऱ्याचदा पोलिसांकडून आणि कोर्टाकडून पैसे भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पण एकदाही अभिनेत्याने पैसे भरले नाही. एकदा चेक दिला, पण बँक खात्यात पैसे नसल्यामुळे चेक बाऊन्स झाला.
advertisement
चेक बाऊन्स प्रकरणामुळे सुद्धा अभिनेता कमालीचा चर्चेत आला होता. हे प्रकरण 2010 चे आहे. राजपाल यादवने त्याने दिग्दर्शित केलेल्या "अता पता लापता" या चित्रपटाच्या फायनान्ससाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि अभिनेता डबघाईला गेला. शिवाय, बँकेत पैसे नसल्यामुळे त्याने काढलेला चेक बाउन्स झाला. एप्रिल 2018 मध्ये, एका दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 138 अंतर्गत दोषी ठरवले आणि त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राजपाल यादवने या निर्णयाला आव्हान देत कोर्टात केस दाखल करत दिलासा घेतला.
advertisement
राजपाल यादव दिलासा मिळाला असला तरी, त्याची थकबाकी सुमारे 19 कोटींपर्यंत वाढल्याचे वृत्त आता समोर आले आहे. पण काही काळानंतर, अभिनेत्याने थकबाकी असलेल्या रकमेचा काही भाग भरला. वारंवार उशिर आणि दिलेली डेडलाईन न पाळल्यामुळे न्यायालयाने त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजपाल यादवने दिलासा मागितल्यानंतर, न्यायालय असे म्हटले की, एखाद्या व्यक्तीची सार्वजनिक प्रोफाइल काहीही असो, त्याला वारंवार दिलासा देता येत नाही. त्यानंतर न्यायालयाने अभिनेत्याला अधिक विलंब न करता सरेंडर (आत्मसमर्पण) होण्याचे निर्देश दिले आणि राजपाल यादवने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत तिहार तुरुंगामध्ये सरेंडर केले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rajpal Yadav Emotional: "सर, माझ्याकडे पैसे नाही...", तिहार जेलच्या अधिकाऱ्यांसमोरच राजपाल यादव भावुक
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement