'सलमानसोबत काम करेन पण...', ऐश्वर्याच्या अजब अटीवर भाईजान तापला, नाकारली 500 कोटी फिल्म
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
ऐश्वर्याच्या एका अटीमुळे सलमान खानने संजय लीला भंसाळी यांच्या सुपरहिट चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की, या चित्रपटातील शाहिद आणि दीपिकाच्या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती काही अन्य स्टार्स होते. ऐश्वर्या राय आणि सलमान खान ही त्यांची नावे आहेत. पण ऐश्वर्याच्या एका अटीमुळे सलमान खानने 'पद्मावत'मध्ये काम करण्यास नकार दिला.
शाहिद कपूरने 'पद्मावत'मध्ये महारावल रतन सिंहची भूमिका साकारली होती. दीपिका पदुकोणने राणी पद्मावतची भूमिका साकारली होती. तर रणवीर सिंगने अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. रणवीरच्या दमदार कामगिरीचे खूप कौतुक झाले. त्याने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आणि मोठ्या पडद्यावर आपल्या खलनायकी अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली.
सलमानसोबत काम करण्यासाठी ऐश्वर्याने ठेवली अजब मागणी
advertisement
IMDB च्या रिपोर्टनुसार, संजय लीला भन्साळी यांना सुरुवातीला या चित्रपटासाठी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना कास्ट करायचे होते. मात्र त्यावेळी दोन्ही स्टार्समधील बोलणी बंद होती. सलमान खानने चित्रपट करण्यास संमती दिली होती, मात्र ऐश्वर्या रायमुळे ही बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत. ऐश्वर्याने संजय यांना अट घातली की, सलमान खानने अलाउद्दीन खिलजीची नकारात्मक भूमिका केली तरच ती चित्रपटात काम करेल, जेणेकरून ऐश्वर्याचा सलमानसोबत कोणताही सीन होणार नाही. सलमान खानने ऐश्वर्या रायची ही अट मान्य करण्यास नकार दिला होता.
advertisement
अशाप्रकारे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन 'पद्मावत' चित्रपट होऊ शकला नाही. यानंतर संजय लीला भन्साळी यांनी शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोणला घेऊन 'पद्मावत' बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रणवीर सिंगला खलनायकाची भूमिका दिली, ज्यामध्ये त्याने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली.
advertisement
500 कोटींहून अधिक कमाई केली
बॉलीवूड हंगामा नुसार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरच्या 'पद्मावत'चे देशभरात एकूण 387.37 कोटी रुपयांचे कलेक्शन होते. या चित्रपटाची जागतिक स्तरावर एकूण कमाई 571.98 कोटी रुपये होती. 2018 मधील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. रणबीर कपूरचा 'संजू' चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2025 9:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'सलमानसोबत काम करेन पण...', ऐश्वर्याच्या अजब अटीवर भाईजान तापला, नाकारली 500 कोटी फिल्म







