बसायला खुर्ची अन् हातात सिगारेट, अभिनेत्याला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट, Photo Viral
- Published by:Minal Gurav
Last Updated:
जेलमधील अभिनेत्याचे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटोपाहून मृत व्यक्तीच्या वडिलांनी याचा तपास करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा सध्या बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये आहे. एका मर्डर केसमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. जेलमधून अभिनेत्याचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्याला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट मिळत असल्याचं या फोटोवरून सांगण्यात येत आहे. जेलमधील अभिनेत्याचे फोटो पाहून मृत रेणुकास्वामीच्या वडिलांनी या गोष्टीचा तपास करण्याची मागणी केली आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मृत रेणुकास्वामीचे वडील शिवा गौडा यांनी राज्य सरकारकडे दर्शनविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय, "दर्शनने घरी बनवलेलं जेवण मागवलं तर त्याला परवानगी देण्यात आली नाही. आमचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हे कसं घडलं याचं मला आश्चर्य वाटत आहे. ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. सरकारने याची सखोल चौकशी करावी अशी माझी विनंती आहे".
advertisement
अभिनेता दर्शनचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या मित्रांबरोबर खुर्ची टाकून बसला आहे. त्याने चांगले कपडे परिधान केले आहेत. सगळ्यांच्या हातात चहाचे कप देखील पाहायला मिळत आहे. चेहरा अत्यंत रिलॅक्स असून सगळे निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. दर्शनच्या हातात सिगारेट देखील पाहायला मिळतेय.
advertisement

काही महिन्यांआधी अभिनेता दर्शन याला रेणुकास्वामीच्या हत्या प्रकारणात अटक करण्यात आली. रेणुकास्वामी हा 33 वर्षांचा रिक्षाचालक होता. त्याचा मृतदेह 9 जून रोजी बंगळुरूच्या एका फ्लायओव्हरवर सापडला. पोलिसांच्या तपासांती असं समोर आलं की, दर्शन याने रेणुकास्वामीला किडनॅक करून त्याची हत्य केली. रेणुकास्वामी हा दर्शनची कथित गर्लफ्रेंड पवित्रा गौडा हिला अश्लील मेसेज करत होता याच रागात दर्शनने त्याची हत्या केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 26, 2024 8:31 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बसायला खुर्ची अन् हातात सिगारेट, अभिनेत्याला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट, Photo Viral








