Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल योगिता चव्हाणच्या भेटीला, PHOTO शेअर करत म्हणाली, दोन अतिविचारी...'

Last Updated:

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस मराठी 5 फेम कोकण हार्डेट गर्ल अंकिता वालावलकर सध्या खूप चर्चेत आहे. याचं कारणही तसंच आहे. अंकिताची सध्या लग्नघाई सुरू आहे.

कोकण हार्टेड गर्ल योगिता चव्हाणच्या भेटीला
कोकण हार्टेड गर्ल योगिता चव्हाणच्या भेटीला
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस मराठी 5 फेम कोकण हार्डेट गर्ल अंकिता वालावलकर सध्या खूप चर्चेत आहे. याचं कारणही तसंच आहे. अंकिताची सध्या लग्नघाई सुरू आहे. अशातच ती सध्या होणाऱ्या नवऱ्यासोबत जोडीने अनेक कलाकारांच्या घरी हजेरी लावताना दिसत आहे. नुकतीच अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत अभिनेत्री योगिता चव्हाणच्या घरी पोहोचली. या भेटीचा खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काहीच दिवसांपूर्वी अंकिताने तिची लग्नपत्रिका शेअर केली होती. तेव्हापासून चाहत्यांना तिच्या लग्नाची आतुरता लागली आहे. मात्र लग्न कधी करणार याची तारीख तिने जाहीर केली नाही. यादरम्यान ती आता योगिता चव्हाणच्या घरी गेल्याचे दिसत आहे. होणाऱ्या नवरा कुणालसोबत तिने योगिता आणि तिच्या नवऱ्याची भेट घेतली.
advertisement
अंकिता वालावलकर पोस्ट
अंकिताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये अंकिता, कुणाल, योगिता आणि तिचा नवरा सौरभ चौघुले असे चौघंजण दिसत आहेत. फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलं, "दोन अतिविचारी आणि दोन चांगले कम्युनिकेटर एकाच फ्रेममध्ये. ओळखा कोण?"
अंकिताच्या या पोस्टवर भरभरून कमेंट येत आहेत. हेमांगी कवीने पोस्टवर कमेंट करत गेस केलं की, "तू आणि योगीता अतिविचारी तर सौरभ आणि कुणाल ग्रेट कम्युनिकेटर." चाहतेही या पोस्टला प्रेम देत आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर आता त्यांची लग्नपत्रिका समोर आली असून लवकरच त्यांची लग्नघाई सुरू होईल. अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी '“आनंदवारी”' हे गाणं एकत्र केलं होतं. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते मग मैत्री प्रेमात बदलली.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल योगिता चव्हाणच्या भेटीला, PHOTO शेअर करत म्हणाली, दोन अतिविचारी...'
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement