Ankita Walawalkar: 'खोटं बोलून, माझ्या नावाने बिझनेस करु नका' अंकिता वालावलकर संतापली

Last Updated:

Ankita Walawalkar: बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे अपडेट देत असते.

अंकिता वालावलकर संतापली
अंकिता वालावलकर संतापली
मुंबई : बिग बॉस मराठी 5 सीझनमधील स्पर्धक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या कामाविषयी आणि लाइफ रिलेटेड अपडेट ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे अपडेट देत असते. अशातच अंकिताचं नाव वापरून बिझनेस केला जात असल्याचं समोर आलं. यामुळं अंकिता भडकली आहे.
अंकिता वालावलकरच्या नावाचा वापर करून एक सोशल मीडिया पेज प्रसिद्धी आणि बिझनेस मिळवत असल्याचा समोर आलं. हे प्रकरण समजताच अंकिता खूप भडकली आहे. अंकिताने अशा लोकांचा समाचार घेतल्याचं समोर आलंय.
‘किर्ती आर्ट अँड क्राफ्ट’ नावाच्या एक इन्स्टाग्रामवर पेज आहे. या पेजवर मुंडावळ्यांचा एक व्हिडिओ शेअर करत अंकिताने तिच्या लग्नासाठी हे बनवून घेतल्याचं सांगितलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच अंकिताने यावर कमेंट करत समाचार घेतला. अंकिता म्हणाली, "मी फक्त एवढंच सांगेन की, छान व्यवसाय करा, पण खोटं बोलून करू नका. मला खोटं बोलून, माझं नाव वापरून व्यवसाय केलेला आवडणार नाही. मी तुमच्याकडून मुंडावळ्या घेतलेल्या नाहीत. जे आमच्या लग्नासाठी खरंच मेहनत करत आहेत, त्यांना क्रेडिट मिळू द्या”.
advertisement
Ankita Walawalkar
Ankita Walawalkar
दरम्यान, अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर आता त्यांची लग्नपत्रिका समोर आली असून लवकरच त्यांची लग्नघाई सुरू होईल. अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी ‘“आनंदवारी”’ हे गाणं एकत्र केलं होतं. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळख होते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ankita Walawalkar: 'खोटं बोलून, माझ्या नावाने बिझनेस करु नका' अंकिता वालावलकर संतापली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement