Swapnil Joshi: यंदा स्वप्नील जोशीच्या सिनेमांचा धमाका, वर्षाच्या सुरुवातीलाच नतमस्तक झाला तिरुपती बालाजीच्या चरणी!

Last Updated:

Swapnil Joshi:निर्माता आणि मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी कायम चर्चेत असतो. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमुळे तो प्रकाशझोतात असतो.

 स्वप्नील जोशी पोहोचला तिरुपती बालाजीला
स्वप्नील जोशी पोहोचला तिरुपती बालाजीला
मुंबई : निर्माता आणि मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी कायम चर्चेत असतो. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमुळे तो प्रकाशझोतात असतो. स्वप्निल जोशीने आपल्या चार्मिंग लूक आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तो कायम वैविध्यपूर्ण काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. 2025 हे वर्ष स्वप्नीलसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि याला खूप कारणं देखील आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच तो तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचला आहे.
स्वप्नीलने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. 2025 वर्षाची भक्तिमय सुरुवात केली आहे. वर्षाची एवढी सुंदर सुरुवात करून त्याने त्याचा 2025 मध्ये कामाला सुरुवात केली आहे.
2025 मध्ये स्वप्नीलचे अभिनेता आणि निर्माता म्हणून अनेक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात 17 जानेवारीला "जिलबी" नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुढे स्वप्नील त्याची निर्मिती आणि अभिनय असलेला "सुशीला - सुजीत" साठी सज्ज होत आहे तर वर्ष संपताना स्वप्नीलने अजून एका चित्रपटाची घोषणा केली 'चिकी चिकी बुबूम बुम' हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नीलच्या कामाची यादी इथेच थांबत नाही तर तो या वर्षात गुजराती सिनेमात देखील झळकणार आहे.
advertisement
दरम्यान, एकंदरीत काय नवीन वर्ष स्वप्नीलसाठी चित्रपटमय ठरणार आहे. मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता स्वप्निल जोशी सतत चर्चेत असतो. स्वप्निल सिनेमा, मालिका, शोमधून तर प्रेक्षकांच्या भेटीला येतच असतो मात्र अनेकदा सोशल मीडियावरही तो सक्रिय पहायला मिळतो.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Swapnil Joshi: यंदा स्वप्नील जोशीच्या सिनेमांचा धमाका, वर्षाच्या सुरुवातीलाच नतमस्तक झाला तिरुपती बालाजीच्या चरणी!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement