'मरेपर्यंत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही', लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी बोलताना वर्षा उसगांवकरांना अश्रू अनावर

Last Updated:

Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली एक अशी इच्छा सांगितली, जी दुर्दैवाने कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

News18
News18
मुंबई : अप्रतिम अभिनय आणि डोळे दिपवणाऱ्या सौंदर्याने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. त्यांच्या याच गुण कौशल्यांमुळे एकेकाळी त्यांना 'मराठीतल्या वंडर गर्ल' म्हणून ओळखले जायचे. मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या वर्षा वयाच्या पन्नाशीतही छोटा पडदा गाजवत आहेत. वर्षा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांसोबत काम केलं आहे. यामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारी यांसारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, वर्षा यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली एक अशी इच्छा सांगितली, जी दुर्दैवाने कधीच पूर्ण होऊ शकली नाही.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी त्यांच्या अकाली निधनावर दुःखही व्यक्त केलं. वर्षा म्हणाल्या, "आज लक्ष्या असता, तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता, असं मला वाटतं. त्याचं अकाली निधन झालं असं मी म्हणेन. लक्ष्याबरोबर मी 'एक होता विदूषक' हा चित्रपट केला होता. त्याआधी लक्ष्या म्हणजे कॉमेडी, कॉमेडी आणि फक्त कॉमेडी, असं समजलं जायचं. लक्ष्याला तीच खंत होती की, माझा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना दिसला पाहिजे."
advertisement
पुढे वर्षा म्हणाल्या, जेव्हा दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी लक्ष्याला हा चित्रपट दिला, तेव्हा त्याने लगेच मला फोन केला. तो म्हणाला की, या चित्रपटात मला तू हवी आहेस. तू हा चित्रपट कर. भले तुला मानधन कमी देतील. हा चित्रपट स्त्रीप्रधान नसेल, पण तू हा चित्रपट करावा अशी माझी इच्छा आहे." आणि लक्ष्याच्या शब्दाखातर वर्षा यांनी तो चित्रपट केला.
advertisement

'एक होता विदूषक'साठी पुरस्कार न मिळाल्याची खंत

वर्षा पुढे म्हणाल्या, "लक्ष्याने ज्या पद्धतीने त्यात काम केलंय, ते मला खूप 'टचिंग' वाटलं. त्याचे सीन नसले तरी तो तिथे हजर असायचा. एक वेगळा लक्षा मला तिथे दिसला." वर्षा यांना आजही वाटतं की, त्या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डेंना पुरस्कार मिळायलाच हवा होता. "मला असं वाटलं की त्याने 'अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स' केला होता. पण त्या वर्षीचा अवॉर्ड त्याला मिळाला नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला कायम ती खंत वाटत राहिली की, या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होता." वर्षा उसगावकरांनाही आजही वाटतं की, तो पुरस्कार लक्ष्याला मिळायलाच हवा होता. "ते जर त्याला मिळालं असतं, तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. त्याच्या त्या विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता." असंही त्या म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मरेपर्यंत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही', लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी बोलताना वर्षा उसगांवकरांना अश्रू अनावर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement