'त्याच्याशी भांडण...', सावत्र आईसोबत कसं आहे शाहिद कपूरचं नातं? अभिनेत्रीने पहिल्यांदाच खरं सांगितलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shahid Kapoor Relationship with Step-Mother Supriya Pathak : शाहिद कपूरची सावत्र आई सुप्रिया पाठक यांनी शाहिदसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं आहे.
मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. शाहिद कपूर त्यापैकीच एक आहे, ज्याच्या आयुष्यात काय सुरू आहे, याची उत्सुकता लोकांना असते. आता नुकतंच शाहिदची सावत्र आई सुप्रिया पाठक यांनी त्याच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं आहे.
advertisement
शाहिद कपूर हा नीलिमा अजीम आणि पंकज कपूर यांचा मुलगा. पंकज कपूर यांनी १९७९ मध्ये नीलिमा अजीम यांच्याशी लग्न केलं, पण ५ वर्षांतच त्यांचा संसार मोडला. त्यानंतर पंकज कपूर यांच्या आयुष्यात सुप्रिया पाठक आल्या. १९८८ मध्ये त्यांनी सुप्रिया पाठक यांच्याशी लग्न केलं, त्यांना रुहान आणि सना ही दोन मुलं आहेत.
advertisement
शाहिदचं त्याच्या सावत्र भावंडांसोबत आणि सावत्र आईसोबतही खूप छान नातं आहे. नुकतंच सुप्रिया पाठक यांनी स्वतः याबद्दल खुलासा केला आहे. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रिया पाठक म्हणाल्या, "तो माझा मुलगा आहे. मुलासोबत आईचं जसं सामान्य नातं असतं, तसंच माझं आणि शाहिदचंही नातं आहे. तो खरंच माझा मुलगा आहे."
advertisement
advertisement
advertisement
याआधीही सुप्रिया पाठक यांनी ट्विंकल खन्नासोबतच्या एका गप्पांमध्ये शाहिदसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा आम्ही एकमेकांना लगेच आवडू लागलो, आणि मला वाटतं तेच नातं पुढे चालू राहिलं. अनेकदा तो आमच्यासोबत नसायचा, पण जेव्हाही तो यायचा, आम्ही एकमेकांशी अगदी नॉर्मल वागायचो."