मित्र करत होते बड्डे पार्टीची चर्चा, प्रशांतने वाढदिवसादिवशी स्वतःला संपवलं, सोलापुरातील घटना
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशांत मल्लिनाथ तडलगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सोलापूर : सोलापूर शहरातील धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना विष्णुपंत नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशांत मल्लिनाथ तडलगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी घरामध्ये आनंदाचे वातावरण होतं. तर गल्लीमधील मित्र प्रशांतचा वाढदिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा करत होते. पण सकाळी प्रशांतने राहत्या घरी सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पत्राच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.
advertisement
नातेवाईकांच्या मदतीने गळफासातून काढून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच प्रशांतला मृत घोषित केले आहे. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात कारणावरून प्रशांतने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे लोकांकडून सांगण्यात येत आहे. तर या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.
advertisement
अचानकपणे प्रशांतने टोकाचा निर्णय घेऊन गळफास घेतल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. महत्त्वाचं म्हणजे आजच प्रशांतचा वाढदिवस असल्याने शुभ दिवशी अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 5:29 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
मित्र करत होते बड्डे पार्टीची चर्चा, प्रशांतने वाढदिवसादिवशी स्वतःला संपवलं, सोलापुरातील घटना







