पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग; राष्ट्रगीताच्या या ओळीतील उत्कल नक्की आहे तरी कुठे?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपल्या राष्ट्रगीतातील शब्दांचा अर्थ आणि त्यामागील इतिहास जाणून घेणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या 'जन गण मन' मध्ये भारताच्या विविधतेचे आणि भौगोलिक व्याप्तीचे दर्शन घडते.
advertisement
राष्ट्रगीताच्या ओळींमध्ये जेव्हा आपण म्हणतो 'पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग' तेव्हा रवींद्रनाथ टागोर आपल्याला शब्दांतून संपूर्ण भारताची सफर घडवून आणतात. यातील बहुतांश राज्यांची नावे आपण सहज ओळखतो, पण जेव्हा 'उत्कल' हा शब्द येतो, तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो की, भारताच्या नकाशावर हे ठिकाण नक्की आहे तरी कुठे?
advertisement
राष्ट्रगीतातील 'उत्कल' नक्की आहे तरी कुठे? चला जाणून घेऊ आपल्या गौरवशाली इतिहासातील हे हरवलेले नावशाळेच्या परिपाठात राष्ट्रगीत म्हणताना 'उत्कल' हा शब्द आपण शेकडो वेळा उच्चारला असेल. पण हा भाग भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एका अत्यंत पराक्रमी आणि कलेने समृद्ध असलेल्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतो, हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे.
advertisement
राष्ट्रगीतातील 'उत्कल' हा शब्द आजच्या ओडिशा (Odisha) राज्यासाठी वापरला गेला आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या या प्रदेशाला 'कलिंग' किंवा 'उत्कल' या नावाने ओळखले जात असे. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताच्या पूर्व भागाचे वर्णन करताना बंगालसोबतच (बंग) उत्कलच्या गौरवशाली परंपरेला राष्ट्रगीतात स्थान दिले.
advertisement
'उत्कल' या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधून झाली आहे. 'उत्' म्हणजे उत्कृष्ट आणि 'कला' म्हणजे कलाकुसर. ज्या प्रदेशातील लोक कलेमध्ये अतिशय निपुण आहेत, असा प्रदेश म्हणजे उत्कल. ओडिशामधील कोर्णाकचे सूर्यमंदिर असो किंवा पुरीचे जगन्नाथ मंदिर, तिथली दगडात कोरलेली वास्तुकला या 'उत्कल' नावाचा सार्थ अभिमान आजही मिरवत आहे.
advertisement
advertisement
1 एप्रिल 1936 रोजी ओडिशा हे भारताचे भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य बनले. या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महापुरुषांना 'उत्कल मणी' (गोपबंधू दास) आणि 'उत्कल गौरव' (मधुसूदन दास) अशा पदव्या बहाल करण्यात आल्या होत्या. आजही दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस ओडिशामध्ये 'उत्कल दिवस' म्हणून एखाद्या सणासारखा साजरा केला जातो.
advertisement
राष्ट्रगीतात या शब्दाचे महत्त्वटागोरांनी जेव्हा 1911 मध्ये हे गीत लिहिले, तेव्हा त्यांना भारताची अखंडता दाखवायची होती. 'द्राविड' शब्दातून त्यांनी संपूर्ण दक्षिण भारताला सामावून घेतले, तर 'उत्कल' शब्दातून त्यांनी ओडिशा आणि आजूबाजूच्या किनारपट्टीच्या भागाला सन्मान दिला. हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर जगन्नाथ पुरीचा समुद्र, तिथली ओडिसी नृत्यपरंपरा आणि प्राचीन मंदिरे उभी राहतात.
advertisement









