धनुषसोबत लग्नाच्या चर्चा, बेबी बंपसह दिसली मृणाल ठाकूर? VIDEO तुफान व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर बेबी बंपसह दिसत असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडीओ समोर येताच 'मृणाल प्रेग्नंट आहे का?' अशा चर्चा सुरू झाल्या.
बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचं नाव साऊथ सुपरस्टार धनुषसोबत जोडलं गेलं. दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघे लग्नही करणार असल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांबाबत दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे स्पष्ट झालेलं नाही. नाही. अशातच मृणालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्यात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर बेबी बंपसह दिसत असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडीओ समोर येताच 'मृणाल प्रेग्नंट आहे का?' अशा चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अंदाज बांधायला सुरुवात केली. काही युजर्सनी तर धनुषसोबतच्या तिच्या चर्चांशी हा विषय जोडला.
advertisement
दरम्यान आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय ज्यामुळे व्हायरल व्हिडीओमागचं खरं कारण समोर आलंय. तसंच सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला.
advertisement
व्हिडीओमागचं सत्य काय?
व्हायरल झालेला हा व्हिडीओ मृणालच्या पर्सनल लाइफमधील नसून सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. मृणाल ठाकूर आणि अभिनेता वरुण धवन हे 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमाच्या सेटवर स्पॉट झाले होते. हा व्हिडीओ त्याच सेटवरील असल्याचं स्पष्ट झालं आहे.
चित्रपटातील भूमिकेसाठी मृणालने बेबी बंपचा लूक केला होता. त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा गैरसमज अनेकांना. प्रत्यक्षात ती प्रेग्नंट नसून हा तिच्या भूमिकेचा भाग आहे.
advertisement
advertisement
सध्या मृणाल ठाकूर तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. नुकत्याच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये मृणाल ठाकूर थेट तिची मायबोली म्हणजेच अहिराणी भाषा बोलताना दिसली. मृणालचं अहिराणी ऐकून तिचे चाहते प्रचंड खूश झाले. पत्रकारांनी मृणालला अहिराणी भाषेत प्रश्न विचारले. तिने सगळ्या प्रश्नांची अहिराणी भाषेत उत्तरं दिली. मृणाल ही मुळची धुळ्याची आहे. तिचा जन्म धुळ्यात झाला आहे. कामानिमित्तानं मृणाल बॉलिवूड, साऊथ, मराठी अशा अनेक भाषांमध्ये काम करतेय. पण तिची अहिराणी भाषा काही ती विसरलेली नाही, हे पाहून तिचे चाहते तिच्यावर चांगलेच फिद झालेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 5:51 PM IST







