Insta Liveमध्ये ढसाढसा रडत मुन्नवरच्या GFनं केला ब्रेकअप, नाजिलाचा Video Viral

Last Updated:

कंगना रणौतच्या लॉकअप शोमध्ये मुन्नवर फारूकीनं नाजिलाबरोबर असलेल्या नात्याची कबूली दिली होती. दोघेही डेट करत होते.


Live Videoमध्ये ढसाढसा रडत मुन्नवरच्या GFनं केला ब्रेकअप
Live Videoमध्ये ढसाढसा रडत मुन्नवरच्या GFनं केला ब्रेकअप
मुंबई, 19 डिसेंबर : बिग बॉसच्या घरात दररोज नवीन ड्रामा पाहायला मिळत असतो. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्कीच्या भांडणांनंतर आता कॉमेडियन मुन्नवर फारूकीची कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात मुन्नवर फारूकीचे सगळे कारनामे बाहेर आले आहेत. काही दिवसांआधी एक ब्लॉगर आयशा खान हिनं मुन्नवरवर गंभीर आरोप केले होते. तिनं स्वत:ला मुन्नवरची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं आणि नुकतीच तिनं बिग बॉस 17च्या घरात एंट्री केली. तिच्या एंट्रीनंतर मु्न्नवरची करंट गर्लफ्रेंड नाजिला हिनं देखील मुन्नवरवर गंभीर आरोप केलेत. मुन्नवरनं आजवर अनेक मुलींना फसवल्याचं तिनं लाइव्ह व्हिडीओमध्ये सांगितलं. नाजिलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
मुन्नवरची गर्लफ्रेंड नाजिला हिनं अनेक खुलासे केले आहेत. 'आयशा आणि मुन्नवर यांचं अफेअर होतं हे मला माहिती नव्हतं. मला यापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात आलं होतं. त्याच्या आयुष्यात मी एकमेव मुलगी आहे असं मला भासवलं होतं. मुन्नवरनं अनेक मुलींबरोबर अफेअर केलेत. पण मला त्यातील कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये', असं म्हणत तिनं इन्स्टाग्रामच्या लाइव्ह मध्ये मुन्नवरबरोबर ब्रेकअपची घोषणा केली.
advertisement
नाजिला पुढे म्हणाली, 'मी हे सगळं कळल्यानंतर शांत बसले कारण त्याला काय म्हणायचं आहे आणि तो ती गोष्ट कशाप्रकारे योग्य आहे हे दाखवतोय हे मला पाहायचं होतं. तो फक्त खोटं बोलल होता आणि मी या सगळ्यावर समाधानी नाही. मला कोणालाच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण गोष्टी इतक्या लेव्हलपर्यंत वाढत गेल्या ज्यामुले मला लाइव्ह यावं लागलं आणि माझी बाजू मला मांडावी लागली'.
advertisement
advertisement
कंगना रणौतच्या लॉकअप शोमध्ये मुन्नवर फारूकीनं नाजिलाबरोबर असलेल्या नात्याची कबूली दिली होती. दोघेही डेट करत होते. नाजिला त्याच्यासाठी खास पोस्ट देखील लिहायची. लॉकअप शो जिंकल्यानंतर मुन्नवर आणि नाजिला हातात हात घेत सेलिब्रेशन केलं होतं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Insta Liveमध्ये ढसाढसा रडत मुन्नवरच्या GFनं केला ब्रेकअप, नाजिलाचा Video Viral
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement