advertisement

पहिलाच असा रिअ‍ॅलिटी शो! ज्यात खेळणार स्पर्धक पण जिंकणार प्रेक्षक, मिळणार 50 लाख रुपये  

Last Updated:

रिअॅलिटी शोमध्ये. प्रेक्षकांना आपला सहभाग नोंदवण्याची संधी मिळते. पण ती वोटिंगमार्फत. पण एक असा शो ज्यात स्पर्धक खेळणार आणि प्रेक्षक जिंकणार, आता हा शो कोणता?

News18
News18
कोणताही रिअॅलिटी शो असो, ज्यात स्पर्धक खेळतात. प्रेक्षकांना यात आपला सहभाग नोंदवण्याची संधी मिळते. पण ती वोटिंगमार्फत. म्हणजे वोट करून आपल्या आवडत्या स्पर्धकाला सेफ करता येत किंवा जिंकवता येतं. पण शोच्या शेवटी स्पर्धक आपण केलेल्या वोटिंगवर तो स्पर्धक जिंकतो आणि त्यालाच त्याचा फायदा होतो.
पण आता पहिल्यांदाच एक असा रिअॅलिटी शो, ज्यात खेळणारा स्पर्धक नाही तर शो पाहणारा प्रेक्षक जिंकणार आहे. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे कसं काय? तो शो कोणता? हे पाहण्याची उत्सुकताही तुम्हाला असेल. हा शो 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. ओटीटीवर तो रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर असेल. टीव्हीवर रात्री 10.30 वाजता कलर्स टीव्हीवर असेल.
advertisement
हा शो ज्यात तब्बल 50 स्पर्धक आहे, जे 50 दिवस एका महालात राहणार आहेत. या महालात राज्य आहे ते लायन म्हणजे सिंहाचं. सिंहाचा मुखवटा घातलेला एक होस्ट तुम्हाला इथं दिसेल.
काय आहे हा शो?
माहितीनुसार द50 हा शो लोकप्रिय फ्रेंच शो लेस सिनक्वांटेचं इंडियन एडिशन आहे. शोची संकल्पना स्क्विड गेमपासून प्रेरित आहे, पण हिंसाचाराशिवाय. पन्नास स्टार एकाच छताखाली राहतील.  त्यांच्यावर गेम मास्टर लायनचं राज्य असेल. त्यांना लायन जे काही सांगेल ते करावे लागेल.
advertisement
लायन आणि स्पर्धकांमध्ये थेट संवाद होणार नाही. सिंहाचे सहा साथीदार असतील, दोन कोल्हे, दोन ससे आणि दोन कुत्रे. त्या साथीदारांच्या मदतीने सिंह स्पर्धकांना कामं सोपवेल.
या शोमध्ये बिग बॉससारखं किचनमधील कोणतंही काम किंवा घरातील कामं नसतील. हा नातेसंबंधाचा नाही तर शक्ती, गूढता आणि मनाचा खेळ आहे. फिजिकल आणि मेंटल टास्क असतील. पराभूत झालेल्याला घराच्या एका रिकाम्या भागात राहण्यास भाग पाडलं जाईल.
advertisement
या शोची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात कोणतेही नियम नसतील. गेम मास्टर लायन सर्व निर्णय घेईल. स्पर्धक त्यांच्या चाहत्यांसाठी खेळतील. लायनने दिलेल्या कामांनुसार, स्पर्धकांना त्यांचे गट बदलावे लागतील. त्याच्या इच्छेनुसार कामाच्या दरम्यान नियम बदलू शकतात.
advertisement
सेलिब्रिटी नाही फॉलोअर्स जिंकणार
या शोशीसंबंधित वेगवेगळे प्रोमो, व्हिडीओ सोशल मीडियावर येत आहेत. नुकत्याच येत असलेल्या व्हिडीओमध्ये जो सेलिब्रिटी या शोमध्ये जिंकणार त्याच्या फॉलोअर्सला 50 लाख रुपये मिळणार आहेत. कोण जिंकणार त्याचा अंदाज फॅन्स बांधणार आणि तो जिंकला तर त्याच्या फॅन्सना पैसे मिळणार आहेत. असं या व्हिडीओ सांगण्यात आलं आहे. आता हे कसं ते शो आल्यावरच समजेल.
advertisement
कोण होस्ट करणार शो?
फराह खान या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा आहे. या शोशी संंबंधित व्हिडीओमध्येही फराह खान दिसते. पण या शोमध्ये सिंहाचा मुखवटा घातलेला द लायन म्हणून एक होस्ट दाखवण्यात आला आहे. जो राजवाड्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. या शोमध्ये दुसरा कोणता होस्ट नसेल असं सांगितलं जातं आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रेम बाईसाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रारही केली होती. एआयचा वापर करून हे ब्लॅकमेल करण्यासाठी हे फोटो-व्हिडीओ बनवले गेल्याचं त्यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
पहिलाच असा रिअ‍ॅलिटी शो! ज्यात खेळणार स्पर्धक पण जिंकणार प्रेक्षक, मिळणार 50 लाख रुपये  
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement