संगीत विश्वावर शोककळा! भर कार्यक्रमात प्रकृती खालावली, काही तासातच प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Singer Death : प्रसिद्ध गायिकेच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. भर कार्यक्रमात तिची तब्येत बिघडली आणि पुढच्या काही तासात तिचा मृत्यू झाला. गायिकेला नेमकं झालेलं काय?
मनोरंजन विश्वात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध गायिकेचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी गायिकेनं अखेरचा श्वास घेतला. PTI ने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. गायिकेच्या कुटुंबींयांनी ही माहिती दिली. गायिकेवर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण उपचारांती त्यांचं निधन झालं.
प्रसिद्ध गायिका तिच्या ठरलेल्या कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम सुरू असताना अचानक गायिकेची तब्येत खालावली. गायिकेची तब्येत बिघडल्याने उपस्थित सगळेच घाबरले. गायिकेचं गाणं ऐकण्यासाठी आतूर असलेले प्रेक्षक काळजीत पडले. गायिकेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे गेल्यानंतर असं काही धक्कादायक घडलं आणि पुढच्या काही तासात गायिकेचा मृत्यू झाला.
advertisement
गीता पटनायक असं गायिकेचं नाव असून त्या प्रसिद्ध ओडिया गायिका होत्या. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्या एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथेच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना त्वरित कटकच्या कॅपिटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचं समोर आलं. त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांती त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
advertisement
गीता पटनायक यांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, त्या गेली पाच दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. त्यांनी अनेक लोकप्रिय ओडिया गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. जाजाबार आणि फुर किना उदिगला बानी ही त्यांनी काही लोकप्रिय गाणी आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 10:54 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
संगीत विश्वावर शोककळा! भर कार्यक्रमात प्रकृती खालावली, काही तासातच प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू








