knowledge : 93 rolls Royce कार्सचा मालक असलेला बाबा, याच्या घरी बॉलिवूडचा सुपरस्टार बाथरूम करायचा साफ!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
भारतामध्ये आतापर्यंत अनेक आध्यात्मिक गुरू होऊन गेले आहेत. त्यापैकी काही जण सध्या हयात आहेत आणि आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करत आहेत, त
मुंबई : भारतामध्ये आतापर्यंत अनेक आध्यात्मिक गुरू होऊन गेले आहेत. त्यापैकी काही जण सध्या हयात आहेत आणि आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करत आहेत, तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. ओशो उर्फ आचार्य रजनीश यांचा अशाच आध्यात्मिक गुरूंमध्ये समावेश होतो. 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशात कुचवाडा गावात जन्मलेले ओशो लहानपणापासून वेगळे होते. त्यांचं मूळ नाव चंद्रमोहन जैन असं होतं. लहानपणापासून ते कमालीचे चिकित्सक होते. शाळेत व कॉलेजमध्ये शिक्षकांना प्रश्न विचारून ते भंडावून सोडायचे.
वसंत जोशी यांनी आपल्या 'ओशो, द ल्युमिनस रिबेल : लाइफ स्टोरी ऑफ अ मेव्हरिक मिस्टिक' या पुस्तकात लिहिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधल्या हितकारिणी कॉलेजातल्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाशी झालेल्या भांडणानंतर ओशो यांना कॉलेजमधून काढून टाकलं होतं. शेवटी त्यांना डी. एन. जैन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
1957मध्ये वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी रायपूरमधील संस्कृत युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1960मध्ये त्यांनी जबलपूर युनिव्हर्सिटीमध्ये फिलॉसॉफी शिकवण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांनी धर्म, राजकारण, समाज अशा विविध गुंतागुंतीच्या विषयांवर प्रवचने द्यायला सुरुवात केली. त्यांनी सेक्सबद्दल उघडपणे चर्चा सुरू केली. त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी सेक्स हा शब्द उच्चारणंदेखील निषिद्ध मानलं जात होतं. काही काळानंतर ओशोंनी प्राध्यापक म्हणून करत असलेली नोकरी सोडली आणि ते आध्यात्मिक गुरू बनले.
advertisement

शाळा आणि कॉलेजच्या दिवसातील ओशो यांचा फोटो
विन मॅककॉर्मेक यांच्या 'द रजनीश क्रॉनिकल्स' या पुस्तकातल्या माहितीनुसार, ओशोंचे विचार इतके वादग्रस्त होते, की अनेकदा भारतीय संसदेत त्याबाबत चर्चा झाली आणि त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या अनुयायांमध्ये प्रत्येक धर्म, समुदाय, लिंग, वंश आणि वयोगटातल्या नागरिकांचा समावेश होता. ओशोच्या सचिव असलेल्या त्यांच्या आई आनंद शीला यांचा हवाला देऊन बीबीसी हिंदीने वृत्त दिलं होतं, की ओशो आपल्या अनुयायांना 'स्वामी' म्हणून संबोधत असत.
advertisement

ओशो काही वर्षं मुंबईत वास्तव्याला होते. नंतर पुण्यात कोरेगावमध्ये त्यांनी आपला आश्रम उभारला. इंग्रजीत प्रवचनं देणाऱ्या ओशोंना काही दिवसात पुण्यात राहण्याचाही कंटाळा आला. दमा, ॲलर्जी अशा अनेक आजारांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर ते आपल्या दोन हजारांहून अधिक अनुयायांसह अमेरिकेत ओरेगॉनमध्ये गेले. त्यामध्ये तत्कालीन बॉलीवूड स्टार अभिनेता विनोद खन्नाचाही समावेश होता.
advertisement
advertisement
ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई 'नेता-अभिनेता : बॉलीवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात लिहितात की, 1977-78 मध्ये, आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना विनोद खन्नाला आयुष्यात एकटेपणा जाणवत होता. तेव्हा त्यांनी ओशोंचा आधार घेतला आणि चित्रपटसृष्टी सोडून दिली. इतर अनुयायांप्रमाणे त्यांनी आश्रमात टॉयलेट क्लीनिंगपासून ते माळीकामापर्यंत विविध कामं केली.
advertisement
आलिशान गाड्यांचं वेड असलेला संन्यासी!
अमेरिकेत असताना ओशोंना लक्झरी गाड्यांची आवड निर्माण झाली. त्यांच्याकडे तब्बल 93 रोल्स रॉइस कार होत्या. साधूला गाड्यांची काय गरज आहे, असा प्रश्न ओशोंना विचारला गेला होता. तेव्हा ते म्हणाले होते, "मला गाड्यांची गरज नाही आणि या गाड्या माझ्या नाहीत; पण माझ्या शिष्यांची इच्छा आहे की, मी 365 दिवस दररोज वेगळ्या रोल्स रॉइसमधून प्रवास केला पाहिजे. माझ्या शिष्यांची इच्छा मी मोडू शकत नाही."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2024 10:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
knowledge : 93 rolls Royce कार्सचा मालक असलेला बाबा, याच्या घरी बॉलिवूडचा सुपरस्टार बाथरूम करायचा साफ!









