परदेसी गर्ल इरिना आणि बारामतीचा रांगडा गडी वैभवचा रोमॅंटिक डान्स, ग्रँड फिनालेमध्ये हटके अंदाज!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 च्या ग्रँड फिनालेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अखेर प्रेक्षकांची इतक्या दिवसांची प्रतिक्षा संपणार असून यंदाच्या सीझनचा आज विनर मिळणार आहे. विनरची घोषणा करण्याआधी बिग बॉसमधील सगळ्याच सदस्यांचे धमाकेदार डान्स होणार आहे.
मुंबई : बिग बॉस मराठी 5 च्या ग्रँड फिनालेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अखेर प्रेक्षकांची इतक्या दिवसांची प्रतिक्षा संपणार असून यंदाच्या सीझनचा आज विनर मिळणार आहे. विनरची घोषणा करण्याआधी बिग बॉसमधील सगळ्याच सदस्यांचे धमाकेदार डान्स होणार आहे. यामध्ये परदेशी गर्ल इरिना रुडाकोवा आणि बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाणचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे.
ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना आणि वैभव धमाकेदार डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहेत. अत्यंत सुंदर आणि रोमँटिक स्टेप्सने हा परफॉर्मन्स खुलून आला आहे. घरातील दोघांची मैत्री, केमेस्ट्री डान्समध्ये देखील दिसून येत आहे. डान्सची झलक इतकी सुंदर तर पूर्ण परफॉर्मन्स किती छान असेल अशी उत्सुकता आता चाहत्यांमध्ये आहे.
advertisement
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या भव्यदिव्य ग्रँड सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला आज (6 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.
advertisement
दरम्यान, बिग बॉस मराठी 5 चे सुपर 6 निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालवणकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर बनले आहेत. आज ग्रँड फिनालेमध्ये या सुपर 6 चा डान्सचा जलवा पाहायला मिळणार आहे. सोबत बिग बॉसच्या बाकी सदस्यांचेही डान्स असणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2024 12:26 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
परदेसी गर्ल इरिना आणि बारामतीचा रांगडा गडी वैभवचा रोमॅंटिक डान्स, ग्रँड फिनालेमध्ये हटके अंदाज!