प्राजक्ता माळीने सांगितली Special Date, पोस्ट शेअर करत म्हणाली, "एका महिन्यानंतर..."
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
प्राजक्ताच्या नव्या पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने स्पेशल डेट सांगितली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळीची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे. ती काय करते, कुठे जाते, तिच्या कामाचे अपडेट्स याबाबत ती चाहत्यांना नेहमीच माहिती देत असते. प्राजक्ताचा 'फुलवंती' हा चित्रपट मागच्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने मोठी कमाई केली. प्राजक्ताच्या या चित्रपटातील कामाचे खूप कौतुकही झाले. सध्या प्राजक्ता चित्रपटाच्या घवघवीत यशाचा आनंद घेत आहे.
प्राजक्ता माळीच्या इन्स्टा पोस्ट नेहमी चर्चेचा विषय असतात. तिच्या या पोस्ट तुफान व्हायरल होतात. दरम्यान प्राजक्ताच्या नव्या पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने स्पेशल डेट सांगितली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टमध्ये काय आहे ते पाहूया.
advertisement
प्राजक्ताने पोस्ट करत एक स्पेशल तारीख सांगितली आहे. ही तारीख तिच्या लग्नाची नाहीये, तर ही तारीख आहे 'फुलवंती' या रिलीजची. गेल्या महिन्यात म्हणजेच ११ ऑक्टोबरला प्राजक्ता आणि गश्मीर महाजनीचा 'फुलवंती' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला असूनही हा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे याचा आनंद व्यक्त करत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
advertisement
प्राजक्ताने पोस्टमध्ये लिहिलेय, "One month to the release of “Phullwanti” 11th Octo- The special date. एका महिन्यानंतरही चित्रपट सिनेमागृहात चालू आहे, याचा विशेष आनंद…" 'फुलवंती' या चित्रपटात प्राजक्ता माळीसह गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे संवाद लेखन प्रवीण विठ्ठल तरडे आणि दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडेंनी केले आहे. दरम्यान हा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र यासाठी प्रेक्षकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर रेंट देऊन पाहता येईल. याबाबत प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2024 9:01 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्राजक्ता माळीने सांगितली Special Date, पोस्ट शेअर करत म्हणाली, "एका महिन्यानंतर..."