Priya Marathe: 'कामाशी काम, कधीच दुसऱ्यांना त्रास नाही...' प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी भावूक, नेमकं काय म्हणाली?

Last Updated:

Priya Marathe passes Away: मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. या दुःखद बातमीने सध्या सर्वत्र एकच खळबळ उडालीय. वयाच्या 38व्या वर्षी तिची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.

प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी भावूक
प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी भावूक
मुंबई : मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. या दुःखद बातमीने सध्या सर्वत्र एकच खळबळ उडालीय. वयाच्या 38व्या वर्षी तिची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. तिच्या जाण्याने मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अशातच आता प्राजक्ता माळीने या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया दिलीय.
प्रियाच्या जाण्याने मराठी इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. चाहत्यांसोबतच तिचे सहकलाकार, मित्रमंडळींनाही धक्का बसला आहे. ABP ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली, “प्रिया ही शांत, सोज्वळ, गुणी मुलगी होती. तिचं कामावर खूप प्रेम होतं. ती कधीच कुणाला दुखावत नसे. देव अशी चांगली माणसं का नेतो, असा प्रश्न मनात येतोय.”
advertisement
प्रियाने आणि प्राजक्ताने सोबत काम केलं होतं. दोघींनी 'एकापेक्षा एक' आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे प्रियाच्या निधनाची बातमी प्राजक्ताच्या मनाला चटका लावून गेली.
प्रियाने करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीतून केली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. ‘या सुखांनो या’, ‘तू तिथे मी’, ‘चार दिवस सासूचे’ अशा मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. हिंदीतही तिने आपली ओळख निर्माण केली. ‘पवित्र रिश्ता’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’ अशा मालिकांमध्ये तिच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
advertisement
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती मात्र ही झुंज अपयशी ठरली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priya Marathe: 'कामाशी काम, कधीच दुसऱ्यांना त्रास नाही...' प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी भावूक, नेमकं काय म्हणाली?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement