राजपाल यादव जेलमधून सुटला पण सुटका नाही! 1.5 कोटींसह कोर्टासमोर सरेंडर कराव्या लागल्या या गोष्टी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 11 दिवसांनी राजपाल यादव जेलमधून बाहेर आलाय. त्याला कोणत्या अटींवर जेलमधून सोडवण्यात आलं?
बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन राजपाल यादव चेक बाऊंसिंग प्रकरणात अडकला होता. त्याने स्वत: सरेंडर केलं. राजपाल यादव 5 फेब्रुवारीपासून तिहाड जेलमध्ये होता. अखेर राजपाल यादवला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे. 18 मार्च 2026 पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. कोर्टाच्या या निर्णयामुळे राजपाल यादव तब्बल 11 दिवसांनी जेलमधून बाहेर आला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजपाल यादवने कोर्टाच्या आदेशानुसार संबंधितांच्या खात्यात 1.5 कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. न्यायालयाने या गोष्टीची नोंद घेत दिलासा देताना त्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर राजपाल यादवला त्याचा पासपोर्टही सरेंडर करावा लागला आहे. त्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही. पुढील सुनावणीपर्यंत त्याला प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईन हजेरी लावावी लागणार आहे.
advertisement
सोमवार सकाळच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाची भूमिका बरीच कडक होती. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की जर राजपाल यादवला अंतरिम जामीन हवा असेल तर त्याला दुपारी 3 वाजेपर्यंत प्रतिवादीच्या नावाने 1.5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) सादर करावा लागेल. न्यायालयाने म्हटले, "जर तुम्ही डीडी सादर केला तर आम्ही तुम्हाला सोडू अन्यथा उद्या सुनावणी होईल."
advertisement
2010 साली राजपाल यादवने 'अता पता लापताट हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याने दिल्लीतील एका कंपनीकडून अंदाजे 5 कोटींचे कर्ज घेतले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. ज्यामुळे कर्ज परतफेडीचे संकट निर्माण झाले. असा आरोप आहे की अभिनेत्याने पैसे देण्यासाठी दिलेले चेक बँकेत बाउन्स झाले, ज्यामुळे केस कनिष्ठ न्यायालयाद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचली. राजपाल यादवला या वादामुळे यापूर्वी तुरुंगवास भोगावा लागला होता.
advertisement
राजपाल यादवने त्याच्या विनोद अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु वारंवार न्यायालयीन खटल्यांमुळे त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर शंका निर्माण झाली आहे. विश्वासार्हता ही मनोरंजन उद्योगातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आणि चेक बाउन्ससारख्या गंभीर प्रकरणांमध्ये सहभाग कलाकाराच्या व्यावसायिक भविष्यावर परिणाम करू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 4:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
राजपाल यादव जेलमधून सुटला पण सुटका नाही! 1.5 कोटींसह कोर्टासमोर सरेंडर कराव्या लागल्या या गोष्टी









