सुशांतच्या मृत्यूनंतर रियाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री; करोडपती बिझनेसमन आहे नवा बॉयफ्रेंड
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
सुशांतनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकी कोणत्या व्यक्तीने एन्ट्री घेतलीये असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. रिया चक्रवर्ती मुंबईतील एका बिझनेसमॅनला डेट करत आहे.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच चर्चेत आली. तेव्हापासून तिच्या प्रत्येक गोष्टीवर नेटकऱ्यांची नजर असून तिची छोट्यातली छोटी गोष्ट चर्चेचा विषय ठरत असते. अशातच आता रिया पुन्हा एकदा चर्चेत आली असून याचं कारण म्हणजे ती एक व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. सुशांतनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकी कोणत्या व्यक्तीने एन्ट्री घेतलीये असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. रिया चक्रवर्ती मुंबईतील एका बिझनेसमॅनला डेट करत आहे.
रिया निखिल कामथ सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिझनेसमन निखिल कामथसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुन्हा एकदा रूमर्ड कपल एकत्र स्पॉट झालं आहे. रिया गाडीच्या मागच्या सीटवर तर निखिल पुढच्या सीटवर बसलेली दिसली. तिचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. निखिल कामथ हा एक बिझनेसमन असून तो हे झिरोधा कंपनीचे संस्थापक आहे. निखिल कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
advertisement
'भारतात महिला सुरक्षित राहू शकत नाहीत...' जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य; पुरुषांवर केली टीका
निखिल आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर डेट करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. दोघांनी 2021 मध्ये एकमेकांना डेट केले होते. हे जोडपं अनेकदा स्पॉट झालं होतं. मात्र, आता दोघेही वेगळे झाले असून निखिल रियाला डेट करत असल्याच्या अफवा आहेत. पण रिया आणि निखिलने त्यांच्या नात्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
रियाबद्दल बोलायचं झालं तर ती यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती. अभिनेत्याच्या मृत्यूपर्यंत ती रिलेशनशिपमध्ये होती. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, रियावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि अभिनेत्यासाठी ड्रग्ज खरेदी केल्याबद्दल तिला एक महिन्यासाठी तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, आता रियाची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
निखिल कामथ हे बिझनेस जगतात मोठं नाव आहे. त्याच्या मेहनतीमुळे आज तो अगदी लहान वयात कोट्यधीश झाला आहे. निखिल कामथ आणि त्यांचा भाऊ नितीन यांची संयुक्त संपत्ती 3.45 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 28 हजार कोटी रुपये आहे. निखिल कामथ झिरोधा कंपनीचे संस्थापक आहेत. निखिल यांची एकट्याची नेट वर्थ तब्बल 9000 कोटींपेक्षा अधिक आहे. निखिल कामत भारतातील सर्वात कमी वयाच्या कोट्यवधींपैकी एक आहेत. निखिल हे घटस्फोटित असून त्यांनी 2019 मध्ये आमंडा पूर्वांकर सोबत लग्न केलं होत, पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर निखिल यांचं नाव मानुषी छिल्लर सोबत जोडलं गेलं. त्यानंतर निखिल कामथ आता रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2024 7:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सुशांतच्या मृत्यूनंतर रियाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री; करोडपती बिझनेसमन आहे नवा बॉयफ्रेंड