Dharmendra: 'मला त्यांच्यासोबत...', लाडक्या धरमजींच्या निधनानंतर सचिन पिळगावकरांनी सांगितली 'ती' आठवण

Last Updated:

Dharmendra Passed Away: अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही जुने फोटो पोस्ट केले.

News18
News18
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोरंजन विश्वातील या 'लाडक्या ही-मॅन' च्या अचानक एक्झिटमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांची तब्येत गेल्या काही महिन्यांपासून ठीक नव्हती. १२ नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
घरी उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. मुंबईतील विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. पुढील महिन्यात ८ डिसेंबर रोजी ते त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करणार होते, पण त्यापूर्वीच त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement

सचिन पिळगांवकरांचा भावूक सलाम

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीही अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही जुने फोटो पोस्ट केले. या दोघांनी 'शोले', 'रेशम की डोरी', 'क्रोधी', 'मझली दीदी' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
advertisement
advertisement
सचिन पिळगांवकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "सर्वांत देखणे, दिग्गज धरमजी आपल्याला सोडून गेले... पण त्यांचा वारसा कायम राहील. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा रिअल ही-मॅन आपल्या हृदयात कायमच जिवंत राहतील. ओम शांती." सचिन यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली असून, सोशल मीडियावर 'धरमजीं'च्या आठवणींना चाहते आणि कलाकारांकडून सलाम केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra: 'मला त्यांच्यासोबत...', लाडक्या धरमजींच्या निधनानंतर सचिन पिळगावकरांनी सांगितली 'ती' आठवण
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement