advertisement

सैफ अली खानचा भुतांनी झपाटलेला बंगला, एका रात्रीत केला रिकामी, सोहाने सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

Last Updated:

Saif Ali Khan Haunted Mansion : सैफ अली खानच्या कुटुंबाचा बंगला भुतांच्या सुळसुळाटामुळे रिकामा करावा लागला. सोहा अली खानने हा थरारक अनुभव शेअर केला.

सैफ अली खानच्या कुटुंबाचा बंगला भुतांच्या सुळसुळाटामुळे रिकामा करावा लागला.
सैफ अली खानच्या कुटुंबाचा बंगला भुतांच्या सुळसुळाटामुळे रिकामा करावा लागला.
मुंबई : राजवाडा म्हटला की डोळ्यांसमोर येतो तो भव्यदिव्य, ऐतिहासिक, शाही थाटातील एक आलिशान महाल. पण सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाच्या ‘पीली कोठी’ या वाड्याबाबत ऐकलं की, एकदम अंगावर काटा येतो. हा तोच वाडा आहे जिथे एका रात्रीत संपूर्ण कुटुंबाला वाडा सोडावा लागला. कारण? भुतांचा सुळसुळाट!
नुकताच ‘छोरी 2’ या हॉरर सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सैफची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खान हिने एक थरारक अनुभव शेअर केला आहे, जो ऐकून कुणालाही धक्का बसेल. सोहाने सांगितलं की त्यांच्या हरियाणामधील पतौडी पॅलेसच्या शेजारी असलेल्या ‘पीली कोठी’ नावाच्या वास्तूला एका शक्तीने गूढतेने व्यापलेलं होतं.
सोहाने सांगितलं, “आम्ही हरियाणाच्या पतौडीचे रहिवासी आहोत. आमच्या पतौडी पॅलेस शेजारी आणखी एक राजवाडा आहे. त्याचे नाव ‘पीली कोठी’. खूप कमी लोकांना याबद्दल माहित आहे. पूर्वी आमचं संपूर्ण कुटुंब येथे राहत होतं. पण एका रात्रीत असं काही घडलं की अचानक सर्वांना सामान बांधून तेथून निघून यावं लागलं होतं. यानंतर आम्ही सर्व पतौडी पॅलेसमध्ये राहू लागलो.”
advertisement
सोहाच्या म्हणण्यानुसार, "त्या वाड्यात अचानक अशा काही घटना घडल्या की संपूर्ण कुटुंबाला रातोरात तो वाडा रिकामा करावा लागला. लोक सांगतात की, तिथे जे राहायचे, त्यांना कुणीतरी अचानक येऊन थप्पड मारायचं. चेहऱ्यावर हाताचे वळ उमटलेले दिसायचे. हे काही सामान्य नव्हतं. अगदी माझ्या पणजीलाही असाच अनुभव आला होता."
advertisement
आजही ‘पीली कोठी’ बंद आणि निराधार आहे. एक उच्चभ्रू रिअल इस्टेट असलेली ही जागा कोणी खरेदीही करत नाही, राहणे तर दूरच! सैफ अली खाननेही काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत ‘त्या’ वाड्याचा उल्लेख करत या अनुभवाची कबुली दिली होती.
जिथे आज सैफ अली खान आणि त्याचे कुटुंब वास्तव्यास आहेत, तो भव्य आणि आलिशान 'पतौडी पॅलेस'. परंतु त्याच्या शेजारील ही ‘पीली कोठी’, जे एकेकाळी कुटुंबाचं मुख्य निवासस्थान होतं, ते आजही ओसाड आणि भयावह आहे.
advertisement
‘छोरी 2’ मधून OTT वर पुनरागमन करणाऱ्या सोहाचं काम प्रेक्षकांनाही आवडलं आहे. येत्या काळात ती ‘ज्वेल थीफ’ आणि ‘देवरा 2’ या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे. सैफ अली खान, जयदीप अहलावत यांसारख्या कलाकारांसोबत तिची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सैफ अली खानचा भुतांनी झपाटलेला बंगला, एका रात्रीत केला रिकामी, सोहाने सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement