जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, संगीतकाराला अटक! प्रसिद्ध उद्योजक संशयाच्या भोवऱ्यात
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zubeen Garg Death : १९ सप्टेंबर रोजी गायक जुबिन गर्गचा सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना त्याचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.
मुंबई : ‘या अली’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला गायक जुबिन गर्गचा मृत्यू अजूनही एक रहस्य बनून आहे. १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना त्याचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे, कारण जुबिनसोबत सिंगापूरच्या याच सहलीत असलेला संगीतकार शेखर ज्योति गोस्वामी याला विशेष तपास पथकाने अटक केली आहे.
शेखर ज्योति गोस्वामीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पण, त्याच्यावर नेमके कोणते आरोप आहेत, याबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पोलीस अजूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
जुबिन गर्गची पत्नी आणि त्याच्या चाहत्यांना संशय आहे की, जुबिनचा मृत्यू नैसर्गिक नाही. काही माध्यमांनी जुबिनच्या मृत्यूचं कारण ‘पाण्यात बुडणं’ असं दिलं होतं, पण त्याच्या पत्नीने ‘अटॅक’ आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
advertisement
आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता!
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध उद्योजक श्यामकानु महंत यांच्यावरही पोलिसांची नजर आहे. महंत यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी एसआयटी अधिकाऱ्यांनी महंत यांच्या घरीही तपासणी केली होती. पण, त्या तपासणीत काय सापडलं, याबद्दल अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेमुळे आसामच्या आणि देशाच्या संगीत क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जुबिन गर्गच्या मृत्यूमागे नेमकं काय रहस्य लपलं आहे, हे आता या चौकशीतून समोर येईल अशी आशा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 10:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, संगीतकाराला अटक! प्रसिद्ध उद्योजक संशयाच्या भोवऱ्यात