Shruti Marathe : 'लोक राधाही 'ब्रा'वरी म्हणायचे', पहिल्याच मालिकेनंतर श्रुती मराठे का आली वादात?

Last Updated:

Shruti Marathe radha hi bawari controversy : 2012 साली 'राधा ही बावरी' ही मालिका झी मराठीवरील संध्याकाळी 7.30 वाजता टेलिकास्ट व्हायची. राधा आणि सौरभ यांच्या प्रेमाची ही गोष्ट होती.

अभिनेत्री श्रृती मराठे
अभिनेत्री श्रृती मराठे
मुंबई : 'राधा ही बावरी' ही मराठी मालिका अनेकांना आठवत असेल. या मालिकेतून श्रुती मराठे ही अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीला मिळाली. मालिकेच्या कथेपासून शीर्षक गीतापर्यंत सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. श्रुती मराठेची ही पहिलीच मालिका होती. या मालिकेतून श्रुतीने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. 'राधा ही बावरी' या मालिकेने श्रुतीला फेम तर मिळवून दिलंच मात्र ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील आली. श्रुतीला 'राधा ही बावरी' ऐवजी 'राधा ही ब्रावरी' अशा शब्दात ट्रोल करण्यात आलं होतं. पहिल्याच मालिकेचा धक्कादायक अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला होता.
2012 साली 'राधा ही बावरी' ही मालिका झी मराठीवरील संध्याकाळी 7.30 वाजता टेलिकास्ट व्हायची. राधा आणि सौरभ यांच्या प्रेमाची ही गोष्ट होती. आपल्या वयाने मोठ्या असलेल्या राधाच्या प्रेमात पडलेला सौरभ आणि त्याच्या प्रेमात बावरी झालेली राधा अशी या मालिकेची कथा होती. 2012 ते 2014 पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
advertisement
या मालिकेत येण्याआधी अभिनेत्री श्रुती मराठे साऊथ इंडस्ट्रीत काम करत होती. तिथे तिने काही सिनेमातही काम केलं होतं. त्या सिनेमात तिने काही बोल्ड सीन्स दिले होते. 'राधा ही बावरी' मालिकेत श्रुती दिसल्यानंतर प्रेक्षकांनी तिला सोशल मीडियावर शोधलं तेव्हा तिचे साऊथ सिनेमातील काही बोल्ड फोटो आणि व्हिडिओ दिसले. ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
advertisement
एका मुलाखतीत बोलताना श्रुती मराठे म्हणाली, "2012 साली 'राधा ही बावरी' ही मालिका करण्याआधी मी काही तमिळ सिनेमात काम केलं होतं. तो सिनेमा चांगलाच हिट झाला होता कारण मी त्यात बिकिनी घातली होती. आता साऊथ इंडस्ट्री आणि आपल्यातलं अंतर कमी झालं आहे. साऊथचे सिनेमे मराठीतही डब केले जातात. 10-15 वर्षांआधी असं नव्हतं."
advertisement
श्रुती पुढे म्हणाली, "तेव्हा मी या इंडस्ट्रीत नवीन होते. कोणत्या गोष्टी कोणत्या पद्धतीने शूट केल्या जातात याचा मला तेवढं भान नव्हतं. मी तेव्हा तो बिकिनी सीन का केला असं मला आजही वाटत नाही. तो सिनेमा 2010 साली रिलीज झाला होता. मराठी प्रेक्षकांना मी असा तमिळ सिनेमा केला आहे आणि त्यात बिकिनी घातली आहे यातलं काहीच माहिती नव्हतं. 'राधा ही बावरी' ही मालिका आली तेव्हा माझं अचानक चर्चेत आलं. श्रुती मराठे गुगलला सर्च केल्यानंतर माझे बिकिनीतील फोटो दिसायचे. त्यामुळे लोकांनी मला खूप ट्रोल केलं. 'राधा ही बावरी' ऐवजी 'राधा ही ब्रावरी' अशा कमेंट्स करायचे."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shruti Marathe : 'लोक राधाही 'ब्रा'वरी म्हणायचे', पहिल्याच मालिकेनंतर श्रुती मराठे का आली वादात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement