'कुंकूच्या सेटवर सुनील दादा मला मेकअप रुममध्ये घेऊन गेला अन्...'; मृण्मयीनं सांगितला 15 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कुंकू मालिकेनंतर 15 वर्षांनी सुनील बर्वे आणि मृण्मयी देशांपाडे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. यानिमित्तानं मृण्मयी देशपांडेनं कुंकू मालिकेच्या सेटवरील एक किस्सा सांगितला.
मुंबई : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात अभिनेते सुनील बर्वे यांच्याबरोबर ती पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतेय. सिनेमात सुनील बर्वे यांनी बाबूजींची प्रमुख भुमिका साकारली आहे तर मृण्मयीनं त्यांच्या पत्नीची ललिताबाईंची भुमिका साकारली आहे. कुंकू मालिकेनंतर 15 वर्षांनी सुनील बर्वे आणि मृण्मयी देशांपाडे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. यानिमित्तानं मृण्मयी देशपांडेनं कुंकू मालिकेच्या सेटवरील एक किस्सा सांगितला.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मृण्मयीनं सांगितलं, "कुंकूचं शुटींग सुरू होतं. एक सीन सुरू होता. मास्टर झाला, क्लोज झाला. सुनील दादाचा क्लोज सीन झाला. मग माझा सीन सुरू होता. बोलता बोलता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असा काहीसा तो सीन होता. मी ती वाक्य बोलले आणि बोलतानाच मला काही सेकंद सुनील दादाच्या डोळ्यातील भाव दिसले. तेव्हा तो तिथे नरसिंह म्हणून रिएक्ट नाही झाला. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी खूप कौतुक दिसलं".
advertisement
( हेही वाचा - सुधीर फडकेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर; भूमिकेबद्दल सुनील बर्वे असं काही म्हणाला.., Video )
मृण्मयी पुढे म्हणाली, "कट झाला आणि तो काहीच न बोलता सगळ्यांसमोर माझा हात धरून मला मेकअप रुममध्ये घेऊन गेला. मला कळेना काय झालं? मी त्याला विचारलं की दादा काय झालं? माझं काही चुकलं का? मला काही कळेनाच कारण संपूर्ण सेटसमोर तो मला घेऊन गेला. त्याने त्याचं पाकिट उघडलं. त्याच्या पाकिटात त्या दिवशी जेवढे पैसे होते ते सगळे त्याने माझ्या हातात ठेवले आणि तो म्हणाला की, तु जे आता केलंस ना बाळा ते जप. तुझं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे आता शब्द नाही. आता माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ते तुझे. आता माझ्याकडे 2 कोटी रुपये असते तरी मी ते तुला दिले असते. त्यानंतर मी खूप भारावुन गेले. मी खूप खुश झाले होते. हा क्षण माझ्यासाठी एक बेंचमार्क झाला".
advertisement
त्यानंतर मृण्मयी ओम भुतकरचा सुख़नचा प्रयोग बघायला गेली होती. तेव्हा ओम भुतकरचं सादरिकरण पाहून मृण्मयी भारावुन गेली. तिला तो प्रयोग प्रचंड आवडला. शो संपल्यानंतर तिनं तिच्या पाकिटात त्या क्षणी जितके पैसे होते ते सगळे ओम भुतकरच्या हातात ठेवले. माझ्यासोबत कोणीतरी असं केलं होतं जे मी आज तुझ्याबरोबर करतेय, असं म्हणत तिनं ओमचं कौतुक केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2024 11:01 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कुंकूच्या सेटवर सुनील दादा मला मेकअप रुममध्ये घेऊन गेला अन्...'; मृण्मयीनं सांगितला 15 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग





