TMKOC: 'हे मां! माताजी...' दयाबेनसाठी दिशा वकानीची अशी झाली होती निवड, 'तारक मेहता'च्या ऑडिशनचा खास किस्सा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वच हा शो आवडीनं पाहतात.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वच हा शो आवडीनं पाहतात. शोमुळे अनेक भूमिका लोकप्रिय बनल्या आणि नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. दयाबेन, जेठालाल बबिताजीपासून सर्वच हटके भूमिकांना चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण तुम्हाला माहितीय का या कलाकारांचं या रोलसाठी ऑडिशन कसं झालं होतं?
शोमधील सर्वात लाडका रोल म्हणजे दयाबेन. दयाबेनची भूमिका दिशा वकानीने साकारली होती. मात्र काही काळापासून अभिनेत्री शोमध्ये दिसत नाही. चाहते तिला खूप मिस करतात. पण दिशा सारखी दयाबेन दुसरं कोणी साकारु शकत नाही म्हणून आजही तो रोल रिकामाच आहे. या रोलसाठी दिशा वकानीचं कसं ऑडिशन झालं होतं याविषयी जाणून घेऊया.
advertisement
मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दिशा वकानीचा ऑडिशन अत्यंत प्रभावी होता. तिने 'दयाबेन'ची भूमिका इतक्या नैसर्गिकपणे साकारली की, संपूर्ण टीम तिच्या अभिनयावर मोहित झाली. तिच्या संवादफेकीतील खास गुजराती लहेजा आणि हावभावांनी पात्राला जीवंत केले. असित मोदी म्हणाले, "ती जेव्हा ऑडिशनमध्ये 'दयाबेन' झाली, तेव्हा आम्ही सर्वजण तिच्या अभिनयावर फिदा झालो."
advertisement
दरम्यान, दिशा वकानीने 2018 मध्ये प्रेग्नंसी रजेवर गेल्यानंतर मालिकेतून ब्रेक घेतला. तिच्या अनुपस्थितीत, निर्मात्यांनी नवीन 'दयाबेन'च्या शोधासाठी ऑडिशन्स घेतल्या. असित मोदी यांनी अलीकडेच एका अभिनेत्रीच्या ऑडिशनवर समाधान व्यक्त केले असून, तिच्यासोबत मॉक शूट्स सुरू आहेत. तथापि, तिची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 24, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
TMKOC: 'हे मां! माताजी...' दयाबेनसाठी दिशा वकानीची अशी झाली होती निवड, 'तारक मेहता'च्या ऑडिशनचा खास किस्सा!