advertisement

ठरलं तर मग! मालिकांच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं असं काही; कलाकारांवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Last Updated:

सध्या टेलिव्हिजन विश्वातील नंबर 1 मालिका कोणती आहे माहितीये का? ही मालिका म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची ‘ठरलं तर मग’ ही मालिका. नुकतंच या मालिकेनं 500  भागांचा टप्पा गाठला. पण टीआरपीमध्येही ही मालिका वरचढ ठरली आहे.

ठरलं तर मग
ठरलं तर मग
मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या एक सो एक दमदार मालिका सुरु आहेत. सगळ्या मालिका कथानकात वेगवेगळे बदल करत, ट्विस्ट आणत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षकही या मालिकांना चांगला प्रतिसाद देत आहेत. पण सध्या टेलिव्हिजन विश्वातील नंबर 1 मालिका कोणती आहे माहितीये का? ही मालिका म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची ‘ठरलं तर मग’ ही मालिका. नुकतंच या मालिकेनं 500  भागांचा टप्पा गाठला. पण टीआरपीमध्येही ही मालिका वरचढ ठरली आहे.
‘ठरलं तर मग’ ही मालिका 05 डिसेंबर 2022 रोजी सुरु झाले होते. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीच्या जोडीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. बघतबघता ‘ठरलं तर मग’ मालिकेनं सगळ्या मालिकांच्या टीआरपीचे रेकॉर्ड्स मोडत अव्वल स्थान गाठलं. गेली दीड वर्षे ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. आता मालिकेनं 500 भागांचा टप्पा गाठताच टीआरपीमध्येही एक विक्रम केला आहे.
advertisement
एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची 'या' लोकप्रिय मराठी मालिकेची नायिका; फक्त इतकी होती पहिली कमाई
सायली आणि अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेनं टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच टीआरपीमध्ये सलग 500 एपिसोड नंबर वन ठरली मालिका ठरण्याचा रेकॉर्ड केला आहे. यावरूनच मालिकेला प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद यांचा अंदाज लावता येऊ शकतो. आता या मालिकेच्या कलाकारांवरती आणि टिमवरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत जुईने सोज्वळ आणि समंजस असलेल्या सायलीची भूमिका साकारली आहे तर अमित भानूशालीने डँशिंग, कर्तबगार आणि हुशार अर्जुन हे पात्र साकारलं आहे. या दोघांनीही आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलेला आहे. याशिवाय कल्पना, चैतन्य, अस्मिता, प्रिया, साक्षी, रविराज, प्रतिमा, नागराज, पूर्णा आजी या सगळ्या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाल्या आहेत. मालिकेचं कथानक आणि दमदार कलाकार यामुळे या ‘ठरलं तर मग’ टीआरपीमध्ये सतत आघाडीवर आहे.
advertisement
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

advertisement
मालिकेने एक नवीन टप्पा गाठला आहे तो म्हणजे या मालिकेचे तब्बल 500 भाग पूर्ण झाले आहे. यासंदर्भात मालिकेचे निर्माते सोहम व आदेश बांदेकर याशिवाय ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पोस्ट शेअर करत सर्व कलाकारांचं कौतुक केलं आहे. “आज सादर होत आहे ‘ठरलं तर मग’ मालिकेचा ५०० वा भाग… आपण या पाचशे भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!” असं म्हणत कलाकारांचं कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ठरलं तर मग! मालिकांच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं असं काही; कलाकारांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement