The 50: निक्कीमुळे भिडले शिव ठाकरे आणि अरबाझ, नव्या टास्कवरून तुफान राडा, दोघांमध्ये हाणामारी? VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
The 50 या शोमध्ये दररोज नवनवे डावपेच पाहायला मिळत असतानाच, आगामी भागात घरामध्ये चक्क राडा पाहायला मिळणार आहे.
मुंबई : कलर्स टीव्हीचा नवा कोरा रिअॅलिटी शो 'The 50' सध्या टीव्ही आणि 'जिओ हॉटस्टार'वर तुफान गाजत आहे. 'लायन्स पॅलेस'मध्ये ५० सेलिब्रिटींच्या गराड्यात सुरू असलेल्या या खेळात आता वैयक्तिक वादांनीही डोकं वर काढलं आहे. या शोमध्ये दररोज नवनवे डावपेच पाहायला मिळत असतानाच, आगामी भागात घरामध्ये चक्क राडा पाहायला मिळणार आहे. हा साधासुधा राडा नसून निक्की तांबोळीमुळे शिव ठाकरे आणि अरबाझ पटेलमध्ये हाणामारी होण्याचीही शक्यता आहे.
इलेक्ट्रिक शॉक अन् वादाची ठिणगी
त्याचं झालं असं की, घरात एक टास्क रंगणार आहे ज्यामध्ये स्पर्धकांना इलेक्ट्रिक शॉक दिले जाणार आहेत. आर्या मुद्दाम निक्कीला डिवचण्यासाठी तिला शॉक देणार असल्याचं म्हणते. यामुळे निक्की प्रचंड अस्वस्थ होते आणि हा टास्क करण्यास नकार देते. मात्र, खेळाची शिस्त आणि स्ट्रॅटेजी जपणाऱ्या शिव ठाकरेला निक्कीचा हा स्वभाव पटत नाही. शिव निक्कीला तिच्या भूमिकेवरून जाब विचारतो आणि तिथूनच वादाला तोंड फुटतं.
advertisement
शिव विरुद्ध अरबाज
जेव्हा शिव आणि निक्कीमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू होतं, तेव्हा निक्कीचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलही या भांडणात उतरतो. आपल्या गर्लफ्रेंडची बाजू सावरण्यासाठी अरबाज शिवला मर्यादा राखण्याची तंबी देतो. "तिच्याशी नीट बोल," असं म्हणणाऱ्या अरबाजला शिवने जुमानलं नाही आणि दोघांमधील वाद विकोपाला गेला.
advertisement
advertisement
शोच्या प्रोमोमध्ये दिसलं की, वाद इतका वाढला की शिवने रागाच्या भरात अरबाजला ढकललं. शिवचा हा पवित्रा पाहून अरबाजचाही ताबा सुटला. त्याने शिवला दम भरला की, "शब्दांची लढाई शब्दांनीच खेळ, हात उचलण्याची चूक करू नकोस!"
पॅलेसमध्ये खळबळ, आता पुढे काय?
दोघांमधील धक्काबुक्की पाहून घरातील इतर सदस्यांनी धाव घेतली आणि दोघांना बाजूला केलं. मात्र, या एका घटनेमुळे घराचे समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. जिथे मैत्री आणि युतीचे खेळ चालतात, तिथे शिव आणि अरबाज यांच्यातील हा संघर्ष घराचे दोन तुकडे करणार असं दिसतंय. शिव ठाकरेचा शांत स्वभाव आणि अरबाजचा आक्रमकपणा यामुळे 'The 50' चा खेळ अधिकच मसालेदार होतोय, हे नक्की.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 2:35 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
The 50: निक्कीमुळे भिडले शिव ठाकरे आणि अरबाझ, नव्या टास्कवरून तुफान राडा, दोघांमध्ये हाणामारी? VIDEO







