Netflix Series: 7 एपिसोडची सीरीज, रिलीज होताच नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंग! तुम्ही पाहिलीत का?

Last Updated:

Netflix series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन सीरीज आणि सिनेमे रिलीज होत असतात. त्यामुळे नेमकं काय पाहावं? असा प्रश्न प्रेक्षकांना पडत असतो. अशातच आता आणखी एक नवी सीरीज नेटफ्लिक्सवर धडकली आहे.

नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंग!
नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंग!
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन सीरीज आणि सिनेमे रिलीज होत असतात. त्यामुळे नेमकं काय पाहावं? असा प्रश्न प्रेक्षकांना पडत असतो. अशातच आता आणखी एक नवी सीरीज नेटफ्लिक्सवर धडकली आहे. या सीरीजने सध्या खळबळ उडवली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ही सीरीज नेमकी कोणती आहे? याविषयी जाणून घेऊया.
नेटफ्लिक्सवर नुकतीच रिलीज झालेली ही सीरीज 7 एपिसोडची आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळत आहे. रिलीज होताच टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये ही सीरीज आली.
आपण बोलत असलेली ही सीरीज आहे, ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’. या सीरीजचा दिग्दर्शक आणि लेखक आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. हीच त्याची पहिली मोठी एन्ट्री आहे आणि पदार्पणातच त्याने नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होण्याचा मोठा रेकॉर्ड केला आहे.
advertisement
ड्रामा, कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि रोमान्स सर्वच या सीरीजमध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेतील आकर्षण म्हणजे स्टारकास्ट. यात लक्ष्य लालवानी, अन्या सिंग, राघव जुयाल, सेहर बंबा, मोना सिंग यांसारखे कलाकार आहेत. पण एवढंच नाही तर बॉबी देओल, करण जोहर, गौतमी कपूर, मनोज पाहवा यांसारखे अनुभवी कलाकारही या प्रवासात सामील झाले आहेत.
advertisement
याशिवाय रणबीर कपूर, अर्जुन कपूर, राजकुमार राव, दिशा पटानी, सारा अली खान, इब्राहिम अली खान, इमरान हाश्मी यांसारख्या स्टार्सचे कॅमिओ रोल प्रेक्षकांना आणखी उत्सुक करून टाकतात. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित या मालिकेतून आर्यन खानने बॉलिवूडच्या चमकदार दुनियेचा वेगळा चेहरा दाखवला आहे. ग्लॅमर, स्पर्धा, मैत्री आणि धक्कादायक खुलासे सगळं काही एका पॅकेजमध्ये.
advertisement
दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ही मालिका नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर पोहोचली. म्हणजेच, आर्यन खानने केलेला हा प्रयत्न प्रेक्षकांना पूर्णपणे भावला आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Netflix Series: 7 एपिसोडची सीरीज, रिलीज होताच नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंग! तुम्ही पाहिलीत का?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement