Marathi Movie : गावकऱ्यांचे डोळे, त्यात काळ्या पोपटाने वाढवला सस्पेन्स; हा मराठी सिनेमा कोणता?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Movie : गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं मराठी सिनेमाचं पोस्टर सध्या व्हायरल होतंय. या पोस्टरने सस्पेन्स वाढवला आहे. हा मराठी सिनेमा आहे तरी कोणता?
सस्पेन्स- थ्रिलर सिनेमांची सध्या मार्केटमध्ये चलती पाहायला मिळतेय. अशातच एका मराठी सिनेमानं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सिनेमाच्या नावापासून त्याच्या पोस्टपर्यंत सगळ्यातच सस्पेन्स पाहायला मिळतोय. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा सिनेमा आहे तरी कोणता.
काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं ज्यामध्ये एका दारावर काही जणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आणि आता एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
advertisement
या पोस्टरमध्ये दिसणारे डोळे नेमके कुणाचे आहेत? हे कलाकार कोण आहेत? या काळया पोपटाचे रहस्य काय ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. सोबतीला "गावात सारी चर्चा रे गप्पांना आलाय ऊत! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलं भूत " अशा गाण्याच्या ओळी ऐकायला येत आहेत. यामुळे या गावाबद्दलची यातील कलाकाराबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
advertisement
तुंबाडची मंजुळा असं या मराठी सिनेमाचं नाव आहे. येत्या 5 जून 2026 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात कोणते कलाकार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागून आहे.

या आगळ्यावेगळ्या पोस्टरबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, तुंबाडची मंजुळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अनेक वर्षानंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा, त्याचा विषय अतिशय मनोरंजक असल्यामुळे याबद्दल प्रदर्शित होणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच उत्सुकतापूर्ण तथा वेगळी असावी या विचारानेच या पोस्टरची ही कल्पना आम्हाला सुचली. या पोस्टर मध्ये दिसणारे गाव आणि हे गावकरी सर्वच अतरंगी असून आता टप्प्याटप्प्याने यातील एक एक गोष्ट उघड करू ज्यामुळे सर्वांची उत्कंठा आणखीनच वाढेल हे निश्चित."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 7:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Movie : गावकऱ्यांचे डोळे, त्यात काळ्या पोपटाने वाढवला सस्पेन्स; हा मराठी सिनेमा कोणता?






