'दुपारी बिअर प्यायचे बाळासाहेब ठाकरे' वर्षा उसगांवकरांनी सांगितला तो किस्सा, म्हणाल्या 'ज्यांच्याबद्दल एवढं...'

Last Updated:

Varsha Usgaonkar on Balasaheb Thackeray : वर्षा उसगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या. बाळासाहेबांच्या शेजारी राहण्याचा अनुभव आणि त्यांच्या दिलखुलास स्वभावाबद्दल त्या बोलल्या.

News18
News18
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगावकर. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी एकेकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवली. विशेष म्हणजे, वर्षा उसगावकर मुंबईतील कलानगर परिसरात राहायच्या, जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही निवासस्थान होतं. बाळासाहेबांच्या अगदी शेजारी राहण्याचा अनुभव आणि त्यांच्यासोबतच्या काही खास आठवणी वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीत उघड केल्या आहेत.

बाळासाहेबांमुळे मिळाली २४ तास पोलीस सुरक्षा!

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगावकर यांनी आपले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या, "बाळासाहेब ठाकरेंचं घर माझ्या शेजारीच होतं. त्यामुळे मला नेहमीच २४ तास छान पोलीस सुरक्षा मिळायची. कधीही, अगदी रात्री-अपरात्री कलानगरमध्ये जाताना मला भीती वाटली नाही."
बाळासाहेबांच्या दिलखुलास स्वभावाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "बऱ्याच वेळेला ते मला घरी बोलावून घ्यायचे, गप्पा मारायचे, छान गोष्टी आणि विनोद सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप खेळकर होता आणि ते फार मार्मिकपणे बोलायचे. ते मला नेहमी म्हणायचे, 'काय गं... गोव्याची मुलगी. कशी काय गोव्यावरून इथे आलीस? दामूकडे राहतेस तू..?'"
advertisement

"कॅलरीशिवाय बिअर पितो!" - बाळासाहेबांचा विनोद

वर्षा उसगावकर यांनी बाळासाहेबांच्या विनोदी आणि अनपेक्षित स्वभावाचा आणखी एक किस्सा सांगितला. "एकदा मी आणि आई त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हाही त्यांनी आम्हाला खूप हसवलं, असाच त्यांचा स्वभाव होता. मला आठवतंय, ते म्हणाले होते की, 'मी बिअर पितो, पण ही कॅलरीशिवाय असलेली बिअर आहे.' तेव्हा मी मनात विचार केला, बापरे, हे सगळ्यांना सांगून बिअर पितात!"
advertisement
त्या पुढे म्हणाल्या, "असा त्यांचा गंमतीशीर स्वभाव होता. मग आमच्यासमोरच ते इतर कलाकारांना फोन लावायचे आणि आमचंही बोलणं करून द्यायचे. मला त्यांचा स्वभाव खूप आवडायचा. मला असं वाटायचं की, बापरे, ज्यांच्याबद्दल एवढं लिहून येतं, ते बाळासाहेब ठाकरे माझ्या शेजारी राहतात. त्यांचं मला रोज दर्शन होतं, म्हणजे मी किती भाग्यवान आहे. 'महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे' असंच ते समीकरण होतं."
advertisement
वर्षा उसगावकर आजही मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. 'स्टार प्रवाह'वरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' यामध्ये त्यांनी भूमिका साकारली. या वयातही त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य हे कौतुकाचा विषय आहे. बाळासाहेबांसोबतच्या या खास आठवणी शेअर करून वर्षा उसगावकर यांनी पुन्हा एकदा जुन्या दिवसांना उजाळा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'दुपारी बिअर प्यायचे बाळासाहेब ठाकरे' वर्षा उसगांवकरांनी सांगितला तो किस्सा, म्हणाल्या 'ज्यांच्याबद्दल एवढं...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement