Vijay Rally Stampede: रक्ताने माखले थलपती विजयचे हात, पोस्टर लावून होतेय अभिनेत्याच्या अटकेची मागणी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Vijay Rally Stampede: अभिनेता ते राजकारणी असा प्रवास सुरू केलेला थलापती विजय सध्या मोठ्या वादात अडकला आहे. करुर येथे झालेल्या त्याच्या पक्षाच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली.
मुंबई : अभिनेता ते राजकारणी असा प्रवास सुरू केलेला थलापती विजय सध्या मोठ्या वादात अडकला आहे. करुर येथे झालेल्या त्याच्या पक्षाच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली. रॅलीदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 40 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तामिळनाडूत संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता विजयचे रक्ताने माखलेल्या हातांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
करूर शहरातील विद्यार्थी संघटना TNSU ने थेट विजयवर आरोप केले आहेत आणि त्याच्या अटकेची मागणी केली आहे. शहरातील भिंतींवर लावलेल्या पोस्टर्समुळे हा वाद आणखी पेटला आहे. पोस्टर्समध्ये विजयचे हात रक्ताने माखलेले दाखवले असून, '39 निष्पाप जीव गेले, आणि विजय पळून गेला. मला खुनी म्हणून अटक करा' असे ठळकपणे लिहिले आहे.
advertisement
या अपघातानंतर विजयवर सातत्याने विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. टीकाकार म्हणतात की अपघातानंतरही विजय लगेच रॅली सोडून चेन्नईला परतला, ज्यामुळे त्यांच्यावर बेजबाबदारीचे आरोप झाले.त्यात भर म्हणजे, काही दिवसांपूर्वी त्यांच्या नीलंकराई घराबाहेर बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली. पोलिस आणि श्वानपथकाने तपास केला, काही संशयास्पद वस्तू सापडली नाही. तरीही सुरक्षा वाढवण्यात आली. या सर्व प्रकारांनी विजयवरचा दबाव वाढला आहे.
advertisement
#WATCH | Tamil Nadu: Posters condemning Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay, showing him with bloodstained hands, have been put up in Karur by the Tamil Nadu Students' Association.
40 people have lost their lives in a stampede that occurred on 27th September, during a… pic.twitter.com/70LvrLaPRG
— ANI (@ANI) September 29, 2025
advertisement
दरम्यान, दुसरीकडे, विजयच्या पक्षाने या प्रकरणाला कटकारस्थान म्हटले आहे. टीव्हीकेने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की विजयला मुद्दाम अडचणीत आणले जात आहे.जखमींच्या कुटुंबीयांसाठी विजयने प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण विरोधकांना हे अपुरं वाटतंय. त्यांचा आरोप आहे की इतक्या मोठ्या दुर्घटनेला फक्त पैशाने झाकता येणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 5:54 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vijay Rally Stampede: रक्ताने माखले थलपती विजयचे हात, पोस्टर लावून होतेय अभिनेत्याच्या अटकेची मागणी