Vivek Agnihotri: 'त्याला शेण खायला द्या..' मराठी जेवणाला नावं ठेवल्यामुळे विवेक अग्निहोत्री ट्रोल, असं म्हणाला तरी काय?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Vivek Agnihotri: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नाही, तर जेवणावरच्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे.
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नाही, तर जेवणावरच्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे. अलीकडेच त्यांनी पत्नीसोबत एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाला नाव ठेवलं. त्यांच्या व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्यावर ट्रोलिंगची झोड सुरु झाली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी महाराष्ट्रीयन जेवणाला गरीबांचं जेवण म्हटलं ज्यामुळे सध्या त्यांच्यावर ट्रोलिंगची झोड होताना दिसत आहे. हा संवाद खरं तर विनोदाच्या ओघात झाला होता, मात्र प्रेक्षकांनी तो लगेच पकडला आणि चर्चेला उधाण आलं. काहींनी त्यांच्यावर टीका केली.
advertisement
विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी नुकतीच Curly Tales ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दोघांनी जेवणाच्या सवयींविषयी सांगितलं. विवेक अग्निहोत्री हे मूळ दिल्लीचे. कबाब, तुपकट पराठे, चिकन, मसालेदार मटण ही त्यांची चव. लग्नानंतर पल्लवीने त्यांना साधं मराठमोळं जेवण वरण-भात, कढी-भात, थालीपीठ, भाकरी–पिठलं खाऊ घातलं. यावर मजेशीर किस्सा सांगताना विवेक म्हणाले,"माझ्यासाठी हा एकदम कल्चर शॉक होता. इतकं साधं जेवण! मला वाटायचं, अरे हे काय गरीबांचं जेवण? पण नंतर लक्षात आलं की मराठी जेवण हे खूप हेल्दी आणि सिम्पल आहे."
advertisement
पल्लवीनेही हसत सांगितलं की, विवेकला जेव्हा पहिल्यांदा वरण-भात खायला दिलं तेव्हा तो चेहऱ्यावर विचित्र हावभाव करून म्हणाला “हे काय? मसाला कुठे आहे?”
दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी म्हणाले, महाराष्ट्रीयन जेवण गरिबांचं जेवण नाहीये. मराठी जेवण गरिबांचं जेवण नाहीये तुझी बायको तसं बनवत असेल. कमी नॉलेजमुळे तुला ब्लेमही करु शकत नाही, त्याला शेण खायला द्या, अशा अनेक कमेंट करत लोक विवेक यांना ट्रोल करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 18, 2025 3:23 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vivek Agnihotri: 'त्याला शेण खायला द्या..' मराठी जेवणाला नावं ठेवल्यामुळे विवेक अग्निहोत्री ट्रोल, असं म्हणाला तरी काय?








