advertisement

Aashay Kulkarni: 'काम करुन पैसे मिळत नाही' मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट!

Last Updated:

मराठी अभिनेता आशय कुलकर्णी सध्या चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याची संतप्त पोस्ट. आशयने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय.

मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट!
मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट!
मुंबई :मराठी अभिनेता आशय कुलकर्णी छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत असतो. विविध मालिकांमध्ये काम करुन त्याने आपली एक वेगळी अशी ओळख बनवली आहे. याशिवाय त्याने बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आशय कुलकर्णी सध्या चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याची संतप्त पोस्ट. आशयने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय.
आशयने केलेल्या कामाचे त्याला पैसे मिळाले नाही. याविषयी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय. आशयने नुकतंच एका मालिकेत काम केलं. मात्र त्याने केलेल्या कामाचे त्याला पैसे मिळाले नाही. त्यानं अनेकदा पैसे मागूनही पैसे मिळाले नसल्यानं आशयने संतापून सोशल मीडियावर संतप्त पोस्ट केली.
advertisement
आशयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच 800 भागांचा टप्पा पार केला. त्या शो चे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, त्या शो चे EP यांना वारंवार फोन केले, मेसेज केले. तरीही पैसे मिळत नाहीये. आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते. तेही 'वेळेत' पण मग वेळेत पैसे देता का येत नाही??? असा संतप्त प्रश्नही आशयने विचारला. आशयने त्याच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताच त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
दरम्यान, पाहिले न मी तुला, मुरांबा, माझा होशील ना, अशा अनेक मालिकांमध्ये आशयने काम केलंय. नुकताच तो व्हिक्टोरिया चित्रपटात झळकला. आता तो लवकरच 'गलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटात दिसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aashay Kulkarni: 'काम करुन पैसे मिळत नाही' मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement