Pooja Khedkar : IAS अधिकाऱ्यांसाठी लाल-निळे दिवे लावण्याचे नियम माहिती आहे का? ऑडीवाल्या मॅडमचं कुठं चुकलं?

Last Updated:

Pooja Khedkar : IAS अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लाल-निळे दिवे लावण्यात आल्याचे तुम्ही पाहिले असेल. आयएएस अधिकारी हे दिवे कधी आणि कसे वापरू शकतात, याचे नियम माहिती आहे का?

IAS अधिकाऱ्यांसाठी लाल-निळे दिवे लावण्याचे नियम माहिती आहे का?
IAS अधिकाऱ्यांसाठी लाल-निळे दिवे लावण्याचे नियम माहिती आहे का?
मुंबई : आयएएस, आयपीएस अधिकारी होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षं मेहनत करतात. अधिकारी झाल्यावर मिळणाऱ्या सुविधांचीही खूप चर्चा होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर लाल-निळे दिवे लावलेले तुम्ही पाहिले असतील; पण कोणताही आयएएस अधिकारी आपल्या गाडीवर लाल-निळा दिवा कधी लावू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आयएएस अधिकारी कधी आणि कोणत्या गाडीवर लाल-निळे दिवे वापरू शकतात आणि त्यासाठी कोणते नियम आहेत हे जाणून घेऊ या.
आयएएस
देशात आयएएस अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि लाल-निळ्या दिव्यांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातली एक ट्रेनी आयएएस अधिकारी सध्या चर्चेत आहे. तिचं नाव पूजा खेडकर असून, ती पुण्यात ट्रेनिंग घेत आहे; मात्र आता पूजाची बदली वाशिमला करण्यात आली आहे. तिने आपल्या खासगी गाडीवर लाल-निळे दिवे, व्हीआयपी नंबर प्लेट लावली. तसंच लेटर पॅड, नेम प्लेट, स्वतंत्र ऑफिस खोली यांचा वापर केला. कोणताही आयएएस अधिकारी लाल-निळा दिवा कधी वापरू शकतो आणि त्यासाठी काय नियम आहेत, हे जाणून घेऊ या.
advertisement
लाल-निळा दिवा
देशातला कोणताही आयएएस अधिकारी फक्त आपल्या अधिकृत वाहनावर लाल-निळा दिवा वापरू शकतो. या संदर्भात अनेक नियम आहेत. पूजा खेडकर सध्या प्रोबेशन पीरियडमध्ये असून, ट्रेनी आयएएस अधिकारी आहे. कोणताही ट्रेनी आयएएस अधिकारी खासगी वाहनावर लाल-निळा दिवा वापरू शकत नाही. तसंच ट्रेनी आयएएस अधिकाऱ्यांना आयएएस अधिकाऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी सुविधा आणि विशेषाधिकार मिळतात.
advertisement
लाल-निळे दिवे फक्त आयएएस रँकचे अधिकारी त्यांच्या सरकारी गाड्यांवर वापरू शकतात. तेही ड्युटीवर असतानाच वापरता येतात. सरकारी वाहनात अधिकारी नसतील, तर नियमानुसार लाल-निळे दिवे झाकून ठेवले जातात. याशिवाय कोणताही आयएएस अधिकारी वैयक्तिक गाडीवर लाल-निळा दिवा वापरू शकत नाही. असं केल्यास स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करू शकतं.
advertisement
लाल-निळ्या दिव्यांबाबत नियम काय?
1 मे 2017 पासून देशात लाल आणि निळ्या दिव्यांचं कल्चर संपलं आहे. नियमांनुसार, फक्त अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, इमर्जंन्सी सेवांमध्ये तैनात असलेल्या गाड्यांसाठीच निळे दिवे वापरता येतील. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सेंट्रल मोटर वाहन कायदा 1989मध्ये बदल करण्यात आले होते. या कायद्यातल्या नियम 108 (1) (3) मधल्या तरतुदीनुसार, कोणत्या वाहनांवर लाल आणि निळे दिवे असावेत हे केंद्र आणि राज्य सरकार ठरवू शकतं.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
Pooja Khedkar : IAS अधिकाऱ्यांसाठी लाल-निळे दिवे लावण्याचे नियम माहिती आहे का? ऑडीवाल्या मॅडमचं कुठं चुकलं?
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement