Explainer: शाहरुखसारखं Power of Attorneyद्वारे संपत्तीवर हक्क मिळवता येतं का? ज्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला, ते खोटं निघालं!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Power of Attorney Explainer: 1993 च्या बाजीगर चित्रपटात पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून संपत्तीवर कब्जा करण्याचं नाट्य दाखवण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात असा अधिकार मालकी देत नाही, तर फक्त कायदेशीर कामकाज करण्याची परवानगी देतो.
1993 साली रिलिझ झालेला बाजीगर हा चित्रपट अनेक कारणांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. या चित्रपटात शाहरुख खानने व्हिलनची भूमीका साकारली होती. चित्रपटात पॉवर ऑफ अटर्नी मुळे संपूर्ण संपत्ती स्वत:च्या नावावर केल्याचे दाखवण्यात आले होते. चित्रपटात सुरुवातीला शाहरुख खानच्या वडिलांची सर्व संपत्ती दलीप ताहिल (चित्रपटात काजोलचे वडील) पॉवर ऑफ अटर्नीद्वारे स्वत:च्या नावावर करून घेतात. चित्रपटाच्या शेवटी शाहरूख त्याच मार्गाने पुन्हा एकदा संपत्ती स्वत:च्या नावावर करून घेतो. या चित्रपटात दाखवण्यात आलेली पॉवर ऑफ अटर्नी हा प्रकार काय आहे? कायदेशीररित्या ते कसे अंमलात येते. याबद्दल जाणून घेऊयात...
advertisement
पॉवर ऑफ अटर्नी (Power of Attorney) या कागदपत्राबद्दल लोकांमध्ये नेहमीच गोंधळ असतो. विशेषतः जेव्हा हे अधिकारपत्र नातेवाईक किंवा मित्राला दिले जाते, तेव्हा बरेच जण असा समज करतात की त्यामुळे मालमत्तेचे मालकीहक्क हस्तांतरित होतात किंवा मूळ मालकाचे अधिकार संपतात. परंतु कायदेशीरदृष्ट्या वास्तव यापेक्षा वेगळे आहे.
advertisement
मालकी नाही, फक्त अधिकार
पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे असे कायदेशीर कागदपत्र जे कोणाला तरी मर्यादित अधिकार देते की तो व्यक्ती मूळ मालकाच्या वतीने काही विशिष्ट कामे करू शकेल. उदाहरणार्थ: मालमत्ता विकणे किंवा नोंदणी करणे, भाडे गोळा करणे, बँकेशी संबंधित व्यवहार करणे इत्यादी. पण यामुळे त्या व्यक्तीला मालमत्तेचा मालक बनवले जात नाही.
advertisement
एखाद्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी देणे म्हणजे त्याला कायदेशीर कामकाज करण्याची परवानगी देणे, पण मालकीहक्क देणे नाही. मालमत्तेचे मालकीहक्क फक्त नोंदणीकृत विक्रीपत्र (Sale Deed) किंवा दानपत्र (Gift Deed) द्वारेच हस्तांतरित होऊ शकतात.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
सन 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की पॉवर ऑफ अटर्नीद्वारे कोणीही मालमत्तेचा मालक होऊ शकत नाही. हे फक्त एक अधिकारपत्र (authority document) आहे जे विशिष्ट मर्यादित हक्क देते, पण त्याद्वारे मालकी मिळत नाही.
advertisement
पॉवर ऑफ अटर्नी केव्हा उपयोगी ठरते?
हे कागदपत्र त्या वेळी अत्यंत उपयोगी ठरते जेव्हा मालमत्ताधारक स्वतः त्या ठिकाणी राहत नाही आणि मालमत्तेशी संबंधित कामे स्वतः करू शकत नाही. उदाहरणार्थ: जर एखादी व्यक्ती दिल्लीमध्ये राहते आणि तिची मालमत्ता मुंबईत असेल, तर ती व्यक्ती मुंबईतील कोणावर तरी विश्वास ठेवून त्याला पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकते. त्यामुळे तो व्यक्ती मालकाच्या वतीने सर्व व्यवहार आणि कायदेशीर प्रक्रिया करू शकतो.
advertisement
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
पॉवर ऑफ अटर्नी नोंदणीकृत (registered) असणे आवश्यक आहे.
त्यात नियुक्त व्यक्ती कोणकोणती कामे करू शकते हे स्पष्टपणे नमूद केलेले असले पाहिजे.
हे न केल्यास भविष्यात कायदेशीर वाद उद्भवू शकतात.
थोडक्यात सांगायचे तर, पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे अधिकार देणे, मालकी नव्हे. मालमत्तेचा खरा मालक तोच राहतो. ज्याच्या नावावर नोंदणीकृत विक्रीपत्र किंवा दानपत्र असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Explainer: शाहरुखसारखं Power of Attorneyद्वारे संपत्तीवर हक्क मिळवता येतं का? ज्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला, ते खोटं निघालं!