किलर Missileने जगाच्या संरक्षण यंत्रणांची झोप उडाली, भारताने विकसित केले सुपर हायपरसोनिक मिसाइल; अमेरिका-रशिया-चीन क्लबला धक्का

Last Updated:

New Hypersonic Missile: भारताने अत्याधुनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र ET-LDHCM यशस्वीरित्या विकसित करून जगभरात खळबळ उडवली आहे. DRDO च्या ‘प्रोजेक्ट विष्णु’ अंतर्गत तयार झालेली ही मिसाइल मॅक-8 वेगाने 1500 किमी अंतरावरील लक्ष्य भेदू शकते.

News18
News18
नवी दिल्ली: भारताने पुन्हा एकदा जगाला चकित केलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने एक असे हायपरसोनिक क्षेपणास्त्र (मिसाइल) विकसित केले आहे जे वेग आणि मारक क्षमतेच्या बाबतीत आतापर्यंतच्या सर्व भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली — ब्रह्मोस, अग्नी आणि आकाश  यांच्यापेक्षा खूप पुढे आहे. या क्षेपणास्त्राला ‘एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी लॉन्ग ड्युरेशन हायपरसोनिक क्रूझ मिसाइल (ET-LDHCM)’ असे नाव देण्यात आले आहे. हे मिसाइल मॅक 8 चा वेग म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा आठपट वेगाने उड्डाण करू शकते आणि 1,500 किलोमीटर अंतरावर लक्ष्य भेदू शकते.
DRDO च्या ‘प्रोजेक्ट विष्णु’ अंतर्गत हे मिसाइल विकसित करण्यात आले आहे. भारताचे आतापर्यंतचे सर्वात प्रगत आणि सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मिसाइल मानले जात आहे. जे ब्रह्मोस, अग्नी-5 आणि आकाश यांच्याही पुढे आहे.
भारताचं नवं ब्रह्मास्त्र
ET-LDHCM भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. हे मिसाइल स्क्रॅमजेट इंजिनने सुसज्ज आहे. जे वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करून पारंपरिक रोटेटिंग कंप्रेसरशिवाय कार्य करते. हे तंत्रज्ञान त्याला MAC-8 (सुमारे 9,800 किमी/तास) वेग देते. जो ब्रह्मोसच्या MAC-3 वेगापेक्षा (सुमारे 3,675 किमी/तास) तीन पट अधिक आहे. ब्रह्मोसची मूळ रेंज 290 किमी होती. जी नंतर 450 किमीपर्यंत वाढवण्यात आली. पण ET-LDHCM ची थेट रेंज 1,500 किमी आहे. त्यामुळे ET-LDHCM भारताचे आतापर्यंतचे सर्वात लांब पल्ल्याचे आणि वेगवान मिसाइल ठरते.
advertisement
शत्रूंची झोप उडवणारे अस्त्र
ET-LDHCM मिसाइल 1,000 ते 2,000 किलोग्रॅम वजनाचे पारंपरिक किंवा अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. याची खासियत म्हणजे ते कमी उंचीवर उड्डाण करते. त्यामुळे रडारला चुकवणे शक्य होते. तसेच आपल्या उड्डाणादरम्यान दिशा बदलू शकते. ज्यामुळे युद्धभूमीत अधिक लवचिक आणि प्रभावी ठरते. ET-LDHCM मिसाइल 2,000 डिग्री सेल्सियस तापमान सहन करू शकते. जे हायपरसोनिक वेगाच्या वेळी स्थैर्य आणि अचूकता निश्चित करतं.
advertisement
ET-LDHCM ला जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही ठिकाणांहून लॉन्च करता येऊ शकते. त्यामुळे शत्रूचे कमांड सेंटर, रडार बेस, नौदलाच्या मालमत्ता आणि मजबूत बंकर यांना लक्ष्य करू शकते. याची अचूकता आणि स्टील्थ क्षमता रशियाच्या S-500 आणि इस्रायलच्या आयरन डोमसारख्या आधुनिक संरक्षण कवचांनाही टक्कर देते.
रशिया-अमेरिका-चीनच्या पंक्तीत भारत
याची यशस्वी चाचणीचा प्रयोग अशा वेळी झाला आहे जेव्हा जागतिक आणि प्रादेशिक तणाव अत्युच्च पातळीवर आहेत. इस्रायल-इराण संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध या पार्श्वभूमीवर भारत आपली संरक्षण क्षमता वेगाने वाढवत आहे. विशेषतः तुर्की-पाकिस्तान युती आणि इंडो-पॅसिफिकमध्ये चीनचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भारताने ब्रह्मोस, अग्नी-5 आणि आकाश यांच्यासह नवीन क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करणे सुरू केले आहे.
advertisement
ET-LDHCM ची यशस्वी चाचणी भारताला रशिया, अमेरिका आणि चीन या मोजक्या देशांच्या श्रेणीत नेऊन पोहोचवते. ज्यांच्याकडे स्वदेशी हायपरसोनिक मिसाइल तंत्रज्ञान आहे. ET-LDHCM मिसाइल केवळ पाकिस्तानविरुद्ध भारताच्या सामरिक ‘डिटरन्स’ची ताकद वाढवत नाही. तर चीनच्या वाढत्या प्रभावालाही प्रत्युत्तर देते.
काय आहे DRDO चा ‘प्रोजेक्ट विष्णु’?
‘प्रोजेक्ट विष्णु’ हा DRDO चा भारतातील सर्वात महत्वाकांक्षी हायपरसोनिक मिसाइल प्रकल्प आहे. याअंतर्गत 12 वेगवेगळ्या हायपरसोनिक मिसाइल सिस्टम विकसित केल्या जात आहेत. यामध्ये केवळ हल्लेखोर मिसाइलच नव्हे, तर शत्रूच्या क्रूझ किंवा बॅलेस्टिक मिसाइल्सना मार्गामध्येच नष्ट करणाऱ्या इंटरसेप्टर मिसाइल्सचाही समावेश आहे.
advertisement
ET-LDHCM हा या प्रकल्पाचा प्रमुख भाग आहे.जो पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे. DRDO ने नोव्हेंबर 2024 मध्ये पहिली हायपरसोनिक चाचणी केली होती. ज्यामध्ये स्क्रॅमजेट इंजिनने 1,000 सेकंदपर्यंत यशस्वीरीत्या काम केलं.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
किलर Missileने जगाच्या संरक्षण यंत्रणांची झोप उडाली, भारताने विकसित केले सुपर हायपरसोनिक मिसाइल; अमेरिका-रशिया-चीन क्लबला धक्का
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement