Explainer: लेकीचं उत्तर ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी शास्त्री गेले, मृत्यूचं गूढ अजून सुटलं नाही, थरारक स्टोरी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Lal bahadur Shastri: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 जानेवारी 1966 झालेल्या कराराला इतिहासात ताश्कंद करार म्हणून ओळखले जाते.ताश्कंद करारानंतर काय घडले आणि लाल बहादुर शास्त्री कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ होते? त्यांच्या मृत्यूला आजही एक गूढ का मानले जाते?
देशाला ‘जय जवान, जय किसान’ हे नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयूब खान यांच्यात 10 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील (तेव्हाचा रशिया) ताश्कंद येथे करार झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या कराराला इतिहासात ताश्कंद करार म्हणून ओळखले जाते. ताश्कंद करारानंतर काय घडले आणि लाल बहादुर शास्त्री कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ होते? त्यांच्या मृत्यूला आजही एक गूढ का मानले जाते?
1965 मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध अनेक आघाड्या उघडल्या आणि दोन्ही देशात युद्ध सुरू झाले. भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि ते लाहोरपर्यंत पोहोचले. भारतीय सैन्याच्या कारवाईने पाकिस्तान बिथरले आणि त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे हस्तक्षेपाची विनंती केली. संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला आणि तत्कालीन सोव्हिएत संघाने दोन्ही देशांमधील करारासाठी ताश्कंद येथे चर्चा आयोजित केली.
advertisement
या चर्चेसाठी भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री तर पाकिस्तानकडून अध्यक्ष जनरल अयूब खान उपस्थित होते.ताश्कंदमध्ये अनेक फेऱ्यांनंतर दोन्ही देशात ताश्कंद करार झाला. या करारात ठरले की भारत आणि पाकिस्तान बलप्रयोग करणार नाहीत. तसेच 25 फेब्रुवारी 1966 पर्यंत सैन्य सीमेवर परत जाईल. दोन्ही देशांमध्ये पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित होतील. या करारानंतर भारताने हाजी पीर आणि टीटवाल हे प्रदेश पाकिस्तानला परत केले.
advertisement
करार झाल्यानंतर रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोशिगिन यांनी लाल बहादुर शास्त्रींना रिसेप्शन दिले. तोपर्यंत सर्व काही ठीक होते. त्यानंतर रात्री ११ वाजता ते डाचा येथे पोहोचले. पंतप्रधान शास्त्रींनी खासगी सचिव जे.एन.सहाय यांना ताश्कंद कराराबद्दल भारतात काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घ्यायला सांगितले. सहाय यांनी सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी आणि एस.एन.द्विवेदी यांनी करारावर टीका केली आहे. परंतु बहुतेकांनी ताश्कंद कराराचे स्वागत केले आहे. यावर शास्त्रीजी म्हणाले, ते विरोधात आहेत आणि सरकारच्या निर्णयांवर टीका करणे त्यांचा अधिकार आहे.
advertisement
थोड्याच वेळात पंतप्रधान शास्त्रीजींनी आपल्या घरी फोन केला. फोन त्यांची मुलगी कुसुम यांनी उचलला. शास्त्रीजींनी विचारले, तुम्हाला कसे वाटले? यावर त्यांच्या मुलीने उत्तर दिले, बाबूजी, आम्हाला काही चांगले वाटले नाही. हाजी पीर आणि टीटवाल पाकिस्तानला देणे चांगले वाटले नाही. अम्माजींनाही (शास्त्रीजींच्या पत्नी) नाही. अम्मा फोनवर बोलायला येणार नाहीत, असे ही कुसुम यांनी त्यांना सांगितले.
advertisement
शास्त्रीजींचे प्रेस सचिव कुलदीप नैयर यांच्या मते,मुलीशी बोलल्यानंतर शास्त्रीजी थोडेसे अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, जेव्हा घरच्यांना चांगले वाटले नाही, तर बाहेरचे लोक काय म्हणतील? त्यानंतर दुसऱ्या दिवशी शास्त्रीजींच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि ताश्कंदपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच धक्का बसला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 11, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/Explainer/
Explainer: लेकीचं उत्तर ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी शास्त्री गेले, मृत्यूचं गूढ अजून सुटलं नाही, थरारक स्टोरी