Mahabharat : युद्धात दररोज हजारो सैनिक मारले जायचे, तरी जेवणाचे प्रमाण 'अचूक' कसं असायचं? एकही दाना कधी वाया गेला नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या प्रचंड मोठ्या आव्हानाचे व्यवस्थापन एका राजाने केले होते. पण, त्याने हे अचूक प्रमाण कसे ठरवले? हे जाणून घेणं खूपच मनोरंजक आहे.
मुंबई : आपल्या दैनंदिन जीवनात, एखादी लहान पार्टी असो, किंवा घरी पाहुणे आलेले असोत, सर्वात मोठे टेन्शन असते ते म्हणजे जेवणाचे प्रमाण. 'जेवण कमी पडायला नको आणि वायाही जायला नको' हा विचार प्रत्येक वेळी डोक्यात असतो. अगदी 10-15 लोक आले तरी देखील त्यांच्यासाठी योग्य प्रमाणात जेवण बनवणं कठीण होतं. त्यात शेकडो किंवा हजारो लोकांसाठी जेवण बनवायचं असेल तर विचार करा की केवढी मोठी समस्या उद्भवत असेल. एवढ्या लोकांसाठी जेवण बनवणं कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही, शिवाय हे एकट्या दुकट्याचं काम नाही.
पण मग असं असेल तर महाभारतात युद्धादरम्यान लाखो सैनिकांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांच्यासाठी जेवण कसं बनवलं जायचं आणि त्यांना हे जेवण कमी पडत नसायचं का?
महाभारताच्या 18 दिवसांच्या युद्धात लाखो सैनिकांनी भाग घेतला होता. कौरवांकडे 11 आणि पांडवांकडे 7, अशी एकूण 18 अक्षौहिणी सेना होती. याचा अर्थ जवळपास 45 लाखांहून अधिक लोक या युद्धात लढत होते. दररोज होणाऱ्या भयानक संहारामुळे, रात्री किती लोकांसाठी जेवण बनवावे, हे ठरवणे हे सैन्यातील सर्वात मोठे आणि अत्यंत कठीण काम होते.
advertisement
या प्रचंड मोठ्या आव्हानाचे व्यवस्थापन एका राजाने केले होते. पण, त्याने हे अचूक प्रमाण कसे ठरवले? हे जाणून घेणं खूपच मनोरंजक आहे. महाभारत युद्ध जाहीर झाले, तेव्हा अनेक राजांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. या तटस्थ राजांपैकी एक होते उडुपीचे राजा.
उडुपीच्या राजाने श्रीकृष्णासमोर एक प्रस्ताव ठेवला. तो कोणत्याही एका पक्षाकडून युद्धात भाग घेणार नाही, पण दोन्ही पक्षांच्या सर्व 45 लाख सैनिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी तो घेईल. श्रीकृष्णाने त्याला तात्काळ परवानगी दिली आणि राजाने भोजन व्यवस्थापनाचे हे कठीण आव्हान स्वीकारले.
advertisement
राजाच्या मनात एकच प्रश्न होता दररोज शेकडो-हजारो सैनिक मारले जातात. मग मी कोणत्या आधारावर जेवण बनवेल? अन्न वाया गेले, तर तो अन्नपूर्णेचा अपमान होईल.
शेंगदाण्यांचे गणित आणि श्रीकृष्णाचा चमत्कार
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 18 दिवसांच्या या दीर्घ युद्धात कधीही जेवण कमी पडले नाही आणि कधीही ते जास्त होऊन वाया गेले नाही. युद्ध संपल्यानंतर, युधिष्ठिराने उडुपीच्या राजाला आदराने विचारले, "महाराज, तुम्ही रोज किती सैनिक वाचले आहेत, हे अचूक कसे ओळखत होता? ज्यामुळे अन्न वाया गेले नाही.
advertisement
तेव्हा उडुपीच्या राजाने या अचूक व्यवस्थापनाचे श्रेय स्वतःला न देता, श्रीकृष्णाला दिले आणि एक रहस्य उघड केले. "महाराज, मी नाही, तर हे सर्व कार्य श्रीकृष्णाच्या कृपेमुळे शक्य झाले. युद्ध सुरू झाल्यापासून भगवान श्रीकृष्ण दररोज रात्री उकडलेले शेंगदाणे (उकडलेली मूगफळी) खायचे. मी नेहमी त्यांच्या शेंगदाणे खाण्याचे प्रमाण मोजायचो."
उदा. आज रात्री जर श्रीकृष्णांनी 10 शेंगदाणे खाल्ले, तर मी दुसऱ्या दिवशी असे समजत होतो की, 10 हजार सैनिक मारले जाणार आहेत. जर त्यांनी 20 शेंगदाणे खाल्ले, तर 20 हजार सैनिक मारले जाणार!
advertisement
याप्रमाणे, श्रीकृष्णांनी खाल्लेल्या शेंगदाण्यांच्या संख्येवरून उडुपीचा राजा दुसऱ्या दिवशीच्या युद्धात मारल्या जाणाऱ्या सैनिकांची संख्या अचूकपणे ठरवत असे. त्यानुसार तो अन्न शिजवत होता.
या कथेवरून हे सिद्ध होते की, जगातील सर्वात मोठ्या युद्धाचे व्यवस्थापन करतानाही, श्रीकृष्णाने आपल्या चमत्कारी बुद्धिमत्तेने अन्न वाया जाऊ दिले नाही. अन्न वाया न घालवता त्याचे योग्य नियोजन करणे, ही किती मोठी जबाबदारी आहे, हे ही कथा आपल्याला शिकवते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 8:58 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Mahabharat : युद्धात दररोज हजारो सैनिक मारले जायचे, तरी जेवणाचे प्रमाण 'अचूक' कसं असायचं? एकही दाना कधी वाया गेला नाही










