EXPLAINER : मराठी भाषेला अभिजात दर्जा, म्हणजे नेमकं काय झालं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतातल्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला.
नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतातल्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला. यानंतर मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत कोणत्या भाषांना मिळालाय दर्जा?
याआधी भारतामध्ये 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. यामध्ये तामीळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्ल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे मापदंड
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
advertisement
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली. मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. “अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो.
advertisement
अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत :
मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे
महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणे.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
October 03, 2024 9:04 PM IST


